Friday, September 11, 2026
HomeनाशिकNashik News : हृदयद्रावक! भिंत कोसळून चिमुकल्याचा मृत्यू

Nashik News : हृदयद्रावक! भिंत कोसळून चिमुकल्याचा मृत्यू

सातपूर | प्रतिनिधी | Satpur

नाशिक शहरातील सातपूर कॉलनी परिसरात (Satpur Coloney Area) अत्यंत दुर्दैवी घटना घडली. सातपूर कॉलनीतील कामगार कल्याण मंडळाच्या जवळच असलेल्या एका जुन्या आणि जीर्ण घराची भिंत अचानक कोसळल्याने दोन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू (Death) झाला.

- Advertisement -

मोहमद उजेर खान असे मृत चिमुकल्याचे नाव असून ही घटना काल सायंकाळच्या सुमारास घडली. परिसरातील नागरिकांच्या माहितीनुसार, संबंधित घर अनेक दिवसांपासून जीर्ण अवस्थेत होते. अचानक भिंत कोसळल्याने जवळ खेळत असलेल्या उजेर खान याला गंभीर दुखापत झाली.

घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेत रुग्णालयात (Hospital) दाखल केले. मात्र डॉक्टरांनी उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, संबंधित घटनेची नोंद सातपूर पोलीस ठाण्यात (Satpur Police Station ) करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे जुन्या घरांच्या सक्षमतेचा मुद्दा चर्चेत आला आहे. सातपूर कॉलनीत मोठ्या प्रमाणात जुनी घरे व जुन्या इमारती आहेत. त्यांची सक्षमता तपासण्याची गरज असून प्रशासनाने याबाबत लक्ष घालण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

ताज्या बातम्या

BRICS

BRICKS Summit 2026: BRICSचा महासंगम! मोदी, पुतीन, शी जिनपिंग एकाच मंचावर...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiभारताच्या अध्यक्षतेखाली १८वी BRICS शिखर परिषद (18th BRICKS Summit 2026) १२ आणि १३ सप्टेंबर २०२६ रोजी नवी दिल्लीतील भारत...