Tuesday, January 6, 2026
HomeनाशिकNashik Politics : नाशिकमध्ये मविआत ठाकरेंची शिवसेना 'मोठा भाऊ'; कोण किती जागा...

Nashik Politics : नाशिकमध्ये मविआत ठाकरेंची शिवसेना ‘मोठा भाऊ’; कोण किती जागा लढवणार? आकडेवारी आली समोर

महायुतीत भाजप स्वबळावर, शिवसेना-राष्ट्रवादीचं जमलं

नाशिक | Nashik

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने (Mahavikas Aagahdi) एकत्रितपणे निवडणूक लढवण्याचा घेतलेला निर्णय हा राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आणि दूरगामी परिणाम करणारा ठरणार आहे. एकीकडे महायुतीत स्पष्ट मतभेद आणि संभ्रमाचे वातावरण असताना दुसरीकडे महाविकास आघाडीने एकसंघ भूमिका जाहीर करून विरोधकांना थेट आव्हान देण्यासाठी सज्ज झाल्याचे चित्र आहे.

- Advertisement -

मतविभाजन टाळण्याची रणनीती गेल्या काही निवडणुकांमध्ये विरोधी मतांचे विभाजन झाल्याचा थेट फायदा भाजपला (BJP) झाल्याचे चित्र नाशिकमध्ये (Nashik) पाहायला मिळाले होते. हीच बाब लक्षात घेऊन महाविकास आघाडीतील शिवसेना (उबाठा) पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष, काँग्रेस आणि मनसे यांनी मतविभाजन टाळण्यासाठी एकत्र येण्याचा व्यावहारिक निर्णय घेतला आहे. ही रणनीती भाजपविरोधात प्रभावी ठरू शकते.

YouTube video player

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे निरीक्षक माजी आमदार सुनील भुसारा (Sunil Bhusara) यांनी मतविभाजन टाळण्यासाठी नाशिकमध्ये मविआ एकत्रित निवडणुकांना सामोरे जाणार असल्याचे सांगितले. महापालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी अभेद्य राहणार असून त्यांच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सर्वाधिक ६२ जागा मिळत असल्याने सर्वात मोठा भाऊ ठरला आहे. त्यापाठोपाठ मनसे २५, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला २२ जागा आणि काँग्रेसला १३ जागा मिळणार आहे. प्रभाग क्रमांक १४, २०, २१ व २२ मधे सर्वाधिक रस्सीखेच सुरु असल्याने उमेदवारांबाबत एकमत न झाल्यास मैत्रीपूर्ण लढत करण्याची घोषणा आज (मंगळवारी) होणार असल्याचे राष्ट्रवादीचे प्रभारी माजी आमदार सुनील भुसारा यांनी म्हटले.

हे देखील वाचा : Nashik NMC Election : उमेदवारी दाखल करण्याचा आज अंतिम दिवस; एबी फॉर्म कुणाला मिळणार?

एकीकडे महायुतीत (Mahayuti) मतभेद स्पष्ट दिसत असतानाच महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांनी एकत्र येत निवडणूक लढवण्याची भूमिका जाहीर केली आहे. भाजपला रोखण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून आघाडीमध्ये मॅरेथॉन चर्चा सुरू होत्या. अखेर सोमवारी (दि. २९) महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय सर्व पक्षांनी घेतला आहे. त्यामुळे निवडणूक अधिकच चुरशीची होणार आहे. नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपने स्वबळाचा नारा दिल्यानंतर आता त्यांच्या विरोधात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शड्डू ठोकला आहे. नव्याने अस्तित्वात आलेल्या या युतीमध्ये शिवसेनेकडे सर्वाधिक जागा असतील तर त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसकडे असतील.

दरम्यान, भाजपने नाशिक महानगरपालिकेत सवतासुभा मांडत ‘एकला चलो रे’ ची भूमिका घेतली आहे. त्यामुळे महायुतीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांना अखेरच्या क्षणापर्यंत झुलवत दूर ठेवले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या मुदतीच्या एक दिवस अगोदर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेत तसे जाहीरही केले आहे. त्यामुळे आता शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस युती, भाजप आणि महाविकास आघाडी (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, कॉंग्रेस, शिवसेना उबाठा पक्ष, मनसे) असा तिरंगी सामना रंगणार असे चित्र स्पष्ट झाले आहे.

मविआत ‘मोठा भाऊ’ म्हणून उबाठा पक्ष

या आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ‘मोठा भाऊ’ची भूमिका देण्यात आली आहे. सर्वाधिक म्हणजे सुमारे ६० जागा लढवण्याचा निर्णय हा शिवसेनेचे संघटनात्मक बळ आणि नाशिकमधील पारंपरिक प्रभाव दर्शवतो. मनसेला शिवसेनेच्या कोट्यातून जागा देण्याचा निर्णय हादेखील राजकीय समन्वयाचा भाग असून, मराठी मतदारांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न स्पष्टपणे दिसतो.

मनसेचा समावेश भाजपसाठी डोकेदुखी

मनसेचा आघाडीत समावेश हा विशेषतः शहरी, मराठी आणि तरुण मतदारांवर प्रभाव टाकणारा घटक ठरू शकतो. याआधी मनसे स्वतंत्र लढल्याने शिवसेना किंवा काँग्रेस-राष्ट्रवादीची मते विभागली जात होती. आता ती शक्यता कमी झाल्याने भाजपची गणिते बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जागावाटपातील तिढा : एकमेव आव्हान

जरी आघाडी एकसंघ झाली असली तरी १० ते १२ जागांचा तिढा अद्याप कायम आहे. विशेषतः काँग्रेस आणि शरद पवार गटातील ३ ते ४ जागांवर मतभेद आहेत. मात्र, वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असल्याने हा तिढा सुटण्याची शक्यता आहे.

महायुतीतील विसंवादाचा फायदा

दुसरीकडे, नाशिकमध्ये महायुतीत फूट पडली आहे. अजित पवार गटाची राष्ट्रवादी आणि शिंदे गटाची शिवसेना एकत्र आली असून, भाजप स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपमध्ये मध्यंतरी मोठ्या प्रमाणात इनकमिंग झाले आहे, त्यामुळे काहीअंशी प्रतिमा मलिन झाली आहे. या घडामोडींसह महायुतीतील समन्वयाचा अभाव, कार्यकर्त्यांमधील संभ्रम आणि प्रचारातील विस्कळीतपणा उघड होत आहे. याचा अप्रत्यक्ष फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो.

निवडणूक अधिक रंगतदार का?

या निवडणुकीत एकसंघ महाविकास आघाडी लढा देत आहे, त्याच वेळी विभाजित महायुतीअंतर्गत स्पर्धेला तोंड देत आहे. दुसरीकडे ठाकरे शिवसेनेचे नेतृत्व सोबतच मनसेचा समावेश ही महायुतीसाठी अडचणीची बाब ठरणार आहे.

महाविकास आघाडीच्या जागांसाठी या निवडणुकीत आम्ही एकसंघपणे लढणार आहोत आणि महापालिकेवर सत्ता स्थापन करणार आहोत. आज उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात येणार आहे.

दत्ताजी गायकवाड उपनेते, शिवसेना (उबाठा)

मनसेसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष अशी आमची महाविकास आघाडी झाली आहे, तर जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. प्रत्येक पक्षाला सन्मानजनक जागा मिळणार आहेत. आगामी महापौर आमचाच होणार.

सुदाम कोंबडे, मनसे शहराध्यक्ष

ताज्या बातम्या

रविंद्र

“माझ्या त्या वक्तव्याकडे…”; विलासरावांवरच्या ‘त्या’ वक्तव्यावर रविंद्र चव्हाणांची आज एका वाक्यात...

0
छ. संभाजीनगर | Chhatrapati Sambhajinagarमहाराष्ट्राचे माजी दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या आठवणी लातूरमधून पुसल्या जातील, अशी भाषा करणारे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना विलासरावांचा...