Wednesday, July 29, 2026
HomeनाशिकNashik NMC Election : उमेदवारी दाखल करण्याचा आज अंतिम दिवस; एबी फॉर्म...

Nashik NMC Election : उमेदवारी दाखल करण्याचा आज अंतिम दिवस; एबी फॉर्म कुणाला मिळणार?

निवडणूक कार्यालयांमध्ये गर्दी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक महापालिका निवडणुकीसाठी (Nashik Municipal Corporation) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आज मंगळवारी दुपारी तीन वाजेपर्यंत आहे. तर आज देखील शहरातील सर्व दहा निवडणूक अधिकारी कार्यालयात उमेदवारी दाखल करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. अर्ज दाखल करण्यासाठी आता शेवटचा दिवस शिल्लक राहिल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

- Advertisement -

दरम्यान, विविध राजकीय पक्षांकडून अधिकृत उमेदवारांना (Candidate) दिले जाणारे एत्री फॉर्मही आजच वितरित होणार आहेत. त्यामुळे पक्षाकडून उमेदवारी निश्चित होणार की नाही, याकडे इच्छुकांचे विशेष लक्ष लागले आहे. एबी फॉर्म मिळाल्याशिवाय अनेक इच्छुकांनी अर्ज दाखल न करता प्रतीक्षा करण्याचा निर्णय घेतल्याचेही चित्र आहे.

सर्व कार्यालयांमध्ये गर्दी

काल दिवसभरात शहरात मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. त्यामुळे मेनरोड येथील पूर्व विभागीय कार्यालय, नवीन नाशिक विभागीय कार्यालय, पंचवटी विभागीय कार्यालय, सातपूर विभागीय कार्यालय, नाशिकरोड विभागीय कार्यालय तसेच भारतनगर येथील अटल दिव्यांग भवना तील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. सकाळपासूनच या कार्यालयांचाहेर समर्थक, कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवारांची वर्दळ होती.

पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

अर्ज दाखल करण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांसोबत मोठ्या संख्येने समर्थक उपस्थित राहत असल्याने अनेक ठिकाणी वाहतुकीवरही परिणाम झाला. संभाव्य गोंधळ टाळण्यासाठी सर्व कार्यालयांच्या परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ठिकठिकाणी पोलिसांकडून गर्दी नियंत्रित करण्याचे काम सुरू होते. आज दुपारी तीन वाजल्यानंतर अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया बंद होणार असून त्यानंतर छाननी, माधार आणि अंतिम उमेदवार यादी जाहीर होण्याच्या टप्प्याकडे निवडणूक प्रक्रियेचा पुढील प्रवास सुरू होणार आहे.

नवीन नाशकात ९४ दाखल

महानगरपालिका निवडणुकीसाठी नवीन नाशिक विभागातील तीन प्रभागांत ९४ नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले.
केले. यावेळी प्रभाग २५ (अ) नागरिकांचा मागास प्रवर्गमधून ८ अर्ज सादर झाले. २५ (ब) मधून ९ अर्ज व २५ (क) सर्वसाधारण महिलांसाठी ९, २५ (ड) सर्वसाधारण महिलांसाठी १५ अर्ज दाखल प्रभाग २६ (अ) नागरिकांचा मागासप्रवर्गसाठी ४. तर २६ (ब) ४ आणि २६ (क) मधून सर्वसाधारण महिलांसाठी ७ तसेच२६ (ड) मध्ये ६ सर्वसाधारण गटातून अर्ज करण्यात आले. २८ (अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग ८ तर २८ (ब) ६ व २८ सर्वसाधारण महिलांसाठी ८ अर्ज केले. तर २८(ड) १० उमेदवारांनी सर्वसाधारणसाठी अर्ज दाखल करण्यात आले. या तीन प्रभागांमध्ये एकूण ९४ अर्ज दाखल करण्यात आले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी महेश जमदाडे यांच्याकडे सर्व उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. यावेळी सहा. निवडणूक निर्णय अधिकारी आबा महाजन, रवींद्र पाटील, जगदीश रत्नपारखी उपस्थित होते. उर्वरित २७,२९,३९ या तीन प्रभागाचे नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याने त्याची आकडेवारी कळू शकली नाही.

प्रभाग १३, १४, २३ मध्ये घोळ कायम

नाशिक महापालिका निवडणुकीसाठी सोमवारी जुने नाशिक परिसरातील काही दिग्गज इच्छुकांनी उमेदवारी अर्ज उमेदवारी अर्ज दाखल केले. मनपा पूर्व विभागातील प्रभाग १३, १४ व २३ सह काही प्रभागांमध्ये अधिकृत उमेदवारीचा घोळ कायम असल्याने आज दुपारपर्यंत कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडते बाकडे लक्ष लागले आहे.पूर्व विभागीय कार्यालय परिसरात दिवसभर राजकीय हालचालींनी मोठी गर्दी पाहायला मिळाली. विषेश म्हणजे भाजपच्या गोटात मोठी चुरस पहायला मिळत आहे. दरम्यान वत्सला खैरे, संजय चव्हाण, सुफी जिन, समिना मेमन, अकरम खतीब, रशिदा शेख, सचिन मराठे आदी काही दिग्गजांची उमेद‌वारी अर्ज दाखल केल्याचे समजते.

प्रभाग १६, २३ व ३० साठी एकूण ९० विक्री

मनपा निवडणुकीसाठी सोमवारी (दि. २९) प्रभाग १६, २३. व ३० साठी एकूण ९० अजाँची विक्री झाली, तर माजी नगरसेवक सतीश सोनवणे, दीपाली कुलकर्णी, सुप्रिया खोडे, श्याम बडोदे, संध्या कुलकर्णी, रुपाली निकुळे, चंद्रकांत खोडे यांनी अर्ज दाखल केले आहेत. सध्या कुठल्याही पक्षाच्या इच्छुक उमेदवारांना एबी फॉर्म मिळालेले नाही तरी इच्छुकांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. दुपारी अर्ज भरण्यासाठी व घेण्यासाठी भारतनगर येथील अटल दिव्यांग भवन कार्यालय परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. अर्ज भरल्यानंतर तपासणीचे काम रात्री आठ वाजेपर्यंत सुरू होते.

पश्चिम विभागात ४९७ अर्जाची विक्री

पश्चिम विभागात गेल्या सहा दिवसात बारा जांगासाठी ४९७ अर्ज वितरित झाले. काल माजी उपमहापौर अजय बोरस्तेंसह अनेक मातब्बरानी अर्ज दाखल केले. प्रभाग ७ मधून१६३अर्ज गेले, १२ मधून १६१ जणांनी अर्ज नेले. प्रभाग २४ मधूनही १७३ अर्ज गेले आहेत. त्यामुळे एकूण ४९७ अर्ज इच्छुकांनी नेले आहेत. अर्ज भरण्यासाठी सोमवारी सकाळपासुन गर्दी होती. अवघा एक दिवस शिद्धक राहिल्याने प्रभाग सात मधून माजी उपमहापौर अजय बोरस्ते, माजी नगर-सेवक मुन्ना हिरे, स्वाती भामरे, हिमगौरी आडके, अजिंक्य फरांदे, राजेंद्र सूर्यवंशी, रोहिणी शिरसाठ यांच्यासह प्रभाग बारामधून पूर्वा सावजी, किशोर घाटे, गणेश कांचळे, प्रभाग २४ मधून राहुल गणोरे, कल्पना चुंबळे, कैलास चुंबळे, चारुशीला गायकवाड, उज्ज्वला निरभवणे आदींनी अर्ज दाखल केले. पक्षाचा अधीकृत उमेदवारांना एबी फॉर्म हे मंगळवारी दोन तास अगोदर दिले जाणार आहेत. त्यानंतर खरे राजकीय चित्र समोर येणार आहे.

प्रभाग सात मध्ये आमदार देवयानी फरांदे यांचे पुत्र अजिक्य फरांदे यांनी अर्ज दखल केला असला तरी पक्षाच्या नव्या धोरणामुळे त्यांना अर्ज मागे घेतला जाण्याची शक्यता आहे. मात्र, मुन्ना हिरे, हिमगौरी आडके व स्वाती भामरे यांच्याबाबत पक्ष काय निर्णय घेतो यावर त्यांचे भवितव्य अवलंबून आहे. अजय बोरस्ते, राजेंद्र सूर्यवंशी व रोहिणी शिरसाठ यांच्याशी लढा द्यावा लागणार आहे. प्रभाग बारामधून पूर्वा सावजी यांच्या रुपाने भाजपचे प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांची दुसरी पिढी आता सक्रिय राजकारणात आली आहे. त्यानंतर प्रभाग २४ मध्ये भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते राहुल निरभवणे यांनी त्यांच्या पत्नी उज्ज्वला निरभवणे यांना प्रथच निडणुकीत उत्तरविले आहे. गणेश कांबळे, व किशोर घाटे, अक्षय गांगुर्डे, प्रभाग चारामधुन उतरले आहेत. यामुळे भारतीय जनता पक्षातच मोठी स्पर्धा आहे.

ताज्या बातम्या

एनसीएमसी स्मार्ट कार्ड साठी मुदतवाढ

0
मुंबई | वृत्तसंस्था Mumbai एसटी प्रवासात शासनाच्या विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अनेक ज्येष्ठ...