Monday, August 17, 2026
HomeनाशिकNashik News : 'गुंगी गुडिया'वरून राजकारण तापलं; नाशिकमध्ये राष्ट्रवादी-काँग्रेस आमनेसामने

Nashik News : ‘गुंगी गुडिया’वरून राजकारण तापलं; नाशिकमध्ये राष्ट्रवादी-काँग्रेस आमनेसामने

नाशिक | Nashik

महाराष्ट्र काँग्रेसच्या (Maharashtra Congress) अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला होता. या व्हिडीओमध्ये त्यांचा ‘गुंगी गुडिया’ असा उल्लेख करण्यात आला होता. त्यावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. या वक्तव्याचा निषेध करत आज (बुधवारी) अजित पवारांच्या राष्ट्रवादीने नाशिकमध्ये काँग्रेसविरोधात आंदोलन केले. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडो मारत राष्ट्रवादीने निषेध व्यक्त केला.

- Advertisement -

राष्ट्रवादीने काँग्रेसने (अजित पवार) जिल्हाधिकारी कार्यालयापासून काँग्रेस कमिटीच्या कार्यालयापर्यंत (Collector Office to Congress Committee) मोर्चा काढला. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता. यावेळी काँग्रेसकडून राहुल गांधींच्या आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या. तर राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवारांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या.

दरम्यान, या आंदोलनात (Protest) राष्ट्रवादीकडून आमदार सरोज अहिरे, जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, दिलीप खैरे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, युवक अध्यक्ष अंबादास खैरे, आकाश पगार यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तर काँग्रेसकडून उध्दव पवार, ज्ञानेश्वर काळे, जाकीर अत्तार, इसाक कुरेशी, गौरव सोनार, अनिल बहोत, सुदेश मोरे, संदीप वाघ, दत्ता सोनवणे, गोपाल लहांगे, बाबा खतीब, सुनिल आव्हाड, फारुख कुरेशी, शंकर जाधव, जावेद शेख, संतोष ठाकूर, संतोष कस्तुरे, आकाश घोलप, योगेश गांगुर्डे, सय्यद मनियार, गोरख साळवे, अनिल बेग, विजय पाटील, प्रविण काटे, अरूण दोंदे, जयेश पोकळे, अशोक शेंडगे आदी पदाधिकारी उपस्थित होते

आमदार आहिरे काय म्हणाल्या?

काँग्रेसने ज्या पद्धतीने सुनेत्रा पवार यांच्याविषयी अपशब्द वापरले आहेत ते निषेधार्थ आहे. राज्यातील सर्व महिला सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी असून, आम्ही काँग्रेसच्या वक्तव्याचा निषेध करतो. हर्षवर्धन सपकाळ यांनी मोठे मन करत सुनेत्रा पवार यांची माफी मागावी, अशी मागणी आमदार सरोज आहिरे यांनी केली.

काँग्रेस शहराध्यक्ष काय म्हणाले?

काँग्रेसचे शहराध्यक्ष बबलू खैरे म्हणाले की, “आमच्या नेत्यांनी कुठल्याही प्रकारे महिलेचा अपमान केलेला नाही. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुनेत्रा पवार यांना पत्रकार परिषदेत बोलू दिले नाही. आमच्या नेत्यांनी सुनेत्रा पवार यांच्यात दुर्गेचे रूप आले पाहिजे, तुम्ही दुर्गेचे रूप घेऊन शेतकर्‍यांचे, महिलांचे प्रश्न सोडवले पाहिजे, त्याविषयी ते वक्तव्य होते. या गुंडापुढे काँग्रेस पक्ष कधीही झुकणार नाही, असे त्यांनी सांगितले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाने काँग्रेस पक्ष कार्यालयांवर मोर्चा काढून स्वतःच हसु करुन घेतले आहे. त्यांनी आमच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याऐवजी नाशिककरांच्या प्रश्नांवर आणि खड्ड्यांमुळे झालेले अपघात त्यात अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला अशा जबाबदारीचे भान ठेवून महानगरपालिकेवर मोर्चा काढला असता तर त्यांच हसू झाले नसते. त्यांना सद्बुध्दी मिळो हीच माफक अपेक्षा, असेही खैरे म्हणाले.

ताज्या बातम्या

Crime Diary : ड्रग्स पकडले; पण साखळीचा माग कधी लागणार?

0
अहिल्यानगर | सचिन दसपुते | Ahilyanagar शहरासह जिल्ह्यात गांजा या अमली पदार्थाच्या तस्करीपुरतीच समस्या मर्यादित राहिलेली नसून, आता एमडीसारख्या घातक आणि तरूणाईला उद्ध्वस्त करणार्‍या ड्रग्सचीही...