Thursday, February 5, 2026
HomeनाशिकNashik Politics : "येत्या आठ दिवसांत..."; संजय राऊतांची भेट घेतल्यानंतर विलास शिंदे...

Nashik Politics : “येत्या आठ दिवसांत…”; संजय राऊतांची भेट घेतल्यानंतर विलास शिंदे स्पष्टच बोलले

नाशिक | Nashik

ठाकरेंच्या शिवसेनेचे महानगप्रमुख विलास शिंदे (Vilas Shinde) हे पक्षात नाराज असल्याच्या चर्चा गेल्या कित्येक दिवसापासून नाशिकच्या राजकारणात (Nashik Politics) सुरु आहेत. तसेच विलास शिंदे हे एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर आज विलास शिंदे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची भेट घेत या चर्चांवर स्पष्टीकरण दिले.

- Advertisement -

यावेळी बोलतांना विलास शिंदे म्हणाले की, “माझ्या मुलीच्या विवाह सोहळ्यानिमित्त सर्वच मित्रमंडळी व जवळच्या प्रियजनांना निमंत्रण दिले होते. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही पत्रिका दिली होती. ते मागील वीस पंचवीस वर्षांपासूनचे पक्षातील सहकारी होते, त्यामुळे ते विवाह सोहळ्याला (Marriage Ceremony) आले त्यांबद्दल त्यांचे आभार मानले. मात्र, पक्षांतर्गत चुकीचा संदेश पसरला जात असल्याने संपर्कप्रमुख खासदार संजय राऊत यांच्या भेटीची वेळ मागितली होती. त्यानंतर आज त्यांची भेट घेतली”, असे त्यांनी म्हटले.

YouTube video player

पुढे ते म्हणाले की, “मी एकनिष्ठ शिवसैनिक असून, शिवसेनाप्रमुखांच्या शिकवणीनुसार दिलेला आदेश पाळणारा आहे. संजय राऊत यांनी मला वेळ दिल्यानुसार त्यांना भेटून मी माझ्या भावना सांगितल्या. माझी भूमिका समजून घेतल्यानंतर येत्या आठ दिवसात नाशिक (Nashik) येथे बैठक घेऊन यावर चर्चा करणार असल्याचे राऊत यांनी सांगितल्याचे विलास शिंदे यांनी स्पष्ट केले. यावेळी शिंदे यांच्यासमवेत माजी नगरसेवक संतोष गायकवाड, ज्ञानेश्वर पाटील व शिवसैनिक उपस्थित होते.

 

ताज्या बातम्या

Crime News : शिक्षिकेची साडेपाच लाखांची ऑनलाईन फसवणूक

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar टेलिग्रामवर हॉटेल रेटिंग व ऑनलाईन टास्क पूर्ण केल्यास पैसे मिळतील, असे आमिष दाखवून खासगी महाविद्यालयातील शिक्षिकेची तब्बल 5 लाख 45 हजार 968...