Tuesday, February 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Politics : युतीच्या घोषणेवरून काँग्रेसचा नाशिकमध्ये सावळा गोंधळ; प्रदेशाध्यक्ष सपकाळ...

Nashik Politics : युतीच्या घोषणेवरून काँग्रेसचा नाशिकमध्ये सावळा गोंधळ; प्रदेशाध्यक्ष सपकाळ नोटीस बजावणार, पदाधिकारी थोरातांना भेटणार

नाशिक | Nashik

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये (Nashik) मनसेसह (MNS) महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी पत्रकार परिषद घेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढणार असल्याची घोषणा केली. मात्र, मविआतील प्रमुख घटक पक्ष असणार्‍या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी नाशिकमध्ये मनसेशी कोणतीही युती करणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच जे नेते पत्रकार परिषदेला उपस्थित होते त्यांना नोटीस पाठवत त्यांच्याकडून खुलासा मागणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. यावरून काँग्रेसमध्ये मतभेद निर्माण झाल्याचे बघायला मिळत आहे.

- Advertisement -

मुंबईत माध्यमांशी सवांद साधतांना प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) म्हणाले की, नाशिकमध्ये झालेल्या सयुंक्त पत्रकार परिषदेला काँग्रेस पक्षाने असा कोणताही प्रतिनिधी अधिकृतरित्या युती करण्यासाठी पाठवलेला नाही आणि गेलाच असेल तर नोटीस पाठवून खुलासा मागवण्यात येणार आहे. नाशिकमध्ये मनसेसोबत झालेल्या युतीचा आणि काँग्रेसचा (Congress) कुठलाही संबंध नाही,असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.

YouTube video player

वरिष्ठांना कळविणार – दिवे

काँग्रेसचे माजी नगरसेवक राहुल दिवे पत्रकार परिषदेत म्हणाले, महाविकास आघाडी ही जनतेच्या हितासाठी आणि शहराच्या विकासासाठी एकत्र आली आहे. स्थानिक पातळीवरील परिस्थिती वरिष्ठांना कळविण्यात येणार आहे. याबाबत पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांची आम्ही भेट घेणार आहे.

ताज्या बातम्या

राहुल

Loksabha Session: राहुल गांधींच्या भाषणादरम्यान लोकसभेत मोठा राडा; सभापतींवर कागदपत्रे फेकली,...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiमंगळवारी संसदेच्या कामकाजादरम्यान, सभागृहाच्या शिष्टाचाराचे उल्लंघन झाल्याचे प्रकरण समोर आले. लोकसभेत झालेल्या गोंधळादरम्यान, काही खासदारांनी सभापतींवर कागदपत्रे फेकली. यावर...