Tuesday, February 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजSudhakar Badgujar : उद्धव ठाकरेंनी हकालपट्टीची कारवाई केल्यानंतर पुढची भूमिका काय? बडगुजर...

Sudhakar Badgujar : उद्धव ठाकरेंनी हकालपट्टीची कारवाई केल्यानंतर पुढची भूमिका काय? बडगुजर स्पष्टच बोलले; म्हणाले, “योग्य वेळी…”

नाशिक | Nashik

ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून (Shivsena UBT Party) हकालपट्टी करण्यात आली आहे. याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड आणि जिल्हाप्रमुख डी.जी.सूर्यवंशी यांनी आज (बुधवार) दिली.

- Advertisement -

बडगुजर यांनी पक्षविरोधी वक्तव्य केल्यामुळे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ही कारवाई केल्याचे दत्ता गायकवाड यांनी सांगितले. या हकालपट्टीनंतर बडगुजर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली असून, यावर भाष्य केले आहे.

YouTube video player

यावेळी बोलतांना सुधाकर बडगुजर म्हणाले की, “पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेला निर्णय मला मान्य आहे. पक्षात नाराजी व्यक्त करणे, हा काही गुन्हा नाही. मात्र, याबाबत माझ्याशी कुठलीही चर्चा झाली नाही. परंतु, पक्षावर नाराजी व्यक्त करणे किंवा मुख्यमंत्र्याना (CM) भेटण्यावरून जर हकालपट्टीची कारवाई होत असेल तर हे चुकीचे आहे”, असे त्यांनी म्हटले.

तसेच “सध्या मी नाशिकच्या (Nashik) बाहेर आहे. त्यामुळे पक्षाच्या पत्रकार परिषदेत उपस्थित राहू शकलो नाही. माझा नियोजित दौरा असल्याचे मी पक्षाला कळवले होते. कोणाची हकालपट्टी (Expelled) करायची कोणाला पक्षात ठेवायचे हा पक्षाचा निर्णय आहे. यावर मी काहीही बोलू इच्छित नसून, सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे. तसेच या हकालपट्टीवर योग्य वेळी माझी प्रतिक्रिया देईल”, असे सुधाकर बडगुजर यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

Praful Patel : प्रफुल पटेलांनी घेतली पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांची...

0
दिल्ली । Delhi महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल...