Tuesday, January 6, 2026
HomeनाशिकNashik Politics : उदय सांगळे-सुनीता चारोस्करांची शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून हकालपट्टी; कारण काय?

Nashik Politics : उदय सांगळे-सुनीता चारोस्करांची शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून हकालपट्टी; कारण काय?

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला (NCP Sharad Pawar)दुहेरी धक्का बसला आहे. २०२४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) ‘तुतारी’ चिन्हावर सिन्नर मतदारसंघातून निवडणूक लढविलेले उदय सांगळे (Uday Sangle) आणि दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविलेल्या सुनिता चारोस्कर आणि त्यांचे पती माजी आमदार रामदास चारोस्कर हे आपल्या समर्थकांसह उद्या (दि.३) रोजी भाजपमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत. त्यानंतर आता या दोघांवरही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून कारवाई करण्यात आली आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने (NCP Sharad Pawar) एक अधिकृत पत्रक काढून उदय सांगळे आणि सुनीता चारोस्कर यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. या पत्रात म्हटले की, “दोघांनीही पक्षविरोधी भूमिका घेत स्वार्थी आणि दलबदलू मानसिकता दाखवली आहे. त्यामुळे पक्षाची शिस्त राखण्यासाठी त्यांची हकालपट्टी करण्यात येत आहे”, असे नमूद केले आहे. त्यामुळे उदय सांगळे आणि सुनिता चारोस्कर यांना पक्षाने बाहेरचा रस्ता दाखवला आहे. सांगळे यांचा पक्षप्रवेश सोहळा आडव्या फाट्यावरील नाईक शिक्षण संस्थेच्या मैदानावर दुपारी १२ वाजता होणार आहे. तर चारोस्कर यांचा पक्षप्रवेश सोहळा संस्कृती लॉन्स नवीन मार्केट यार्ड दिंडोरी येथे सकाळी ११ वाजता होणार आहे. हे दोन्ही पक्षप्रवेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पार पडणार आहेत.

YouTube video player

हे देखील वाचा : Nashik Politics : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दुहेरी धक्का; दोन ‘बडे’ नेते हाती घेणार कमळ

दरम्यान, सांगळे आणि चारोस्कर यांच्यासह आजी-माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे चेअरमन हे देखील पक्षप्रवेश (Join) करणार आहेत. या दोन्ही पक्षप्रवेश सोहळ्यासाठी आमदार देवयानी फरांदे, आमदार राहुल ढिकले, डॉ. राहुल आहेर यांच्यासह पक्षाचे महामंत्री विजय चौधरी, संघटन मंत्री रवी अनासपुरे, जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, लक्ष्मण सावजी, विजय साने उपस्थित राहणार आहेत.

ताज्या बातम्या

Nashik Crime : ‘त्या’ खुनामागे छेडछाड! तरुणाच्या हत्येनंतर जमावाची संशयिताच्या घरावर...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik पेठरोड परिसरातील (Peth Road Area) अश्वमेघ नगरात तरुणाची निघृण हत्या झाल्यानंतर या घटनेला रविवारी (दि. ४) भरदुपारी गंभीर वळण मिळाले....