Tuesday, February 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Politics : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दुहेरी धक्का; दोन 'बडे'...

Nashik Politics : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दुहेरी धक्का; दोन ‘बडे’ नेते हाती घेणार कमळ

नाशिक | Nashik

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला (NCP Sharad Pawar) आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी दुहेरी धक्का बसला आहे. मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) ‘तुतारी’ चिन्हावर सिन्नर मतदारसंघातून निवडणूक लढविलेले उदय सांगळे (Uday Sangle) आणि दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविलेल्या सुनिता चारोस्कर आणि त्यांचे पती माजी आमदार रामदास चारोस्कर हे आपल्या समर्थकांसह सोमवार (दि.३) रोजी भाजपमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत. यात सांगळे यांचा पक्षप्रवेश सोहळा आडव्या फाट्यावरील नाईक शिक्षण संस्थेच्या मैदानावर दुपारी १२ वाजता होणार आहे. तर चारोस्कर यांचा पक्षप्रवेश सोहळा संस्कृती लोन्स नवीन मार्केट यार्ड दिंडोरी येथे सकाळी ११ वाजता होणार आहे. हे दोन्ही पक्षप्रवेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पार पडणार आहेत.

- Advertisement -

भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव यांनी गुरुवारी (दि.३०) सिन्नरला भेट देत प्रवेश सोहळ्याचे नियोजन करत ठिकाण निश्चित केले. यावेळी सांगळे म्हणाले,”सन २०२४ ची विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून लढवली होती. त्यावेळी राज्यभर महायुतीची लाट असतानाही आपल्याला लाखभर मते पडली. त्यामुळे ८-९ महिन्यांपासून सोबतच्या सर्व सहकाऱ्यांचा भाजपमध्ये जावे यासाठी आग्रह सुरू होता. देशात, राज्यात भाजपची सत्ता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाने आपण प्रभावीत झालो असल्याचे त्यांनी सांगितले.

YouTube video player

विकासकामांसाठी भाजपसोबत जाणे फायद्याचे ठरेल, असे सर्वांचेच म्हणणे पडले. विधानसभा निवडणुकीत सोबत असणारे भारत कोकाटे यांनी भाजपत प्रवेश केला. त्यामुळे भाजपत (BJP) प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. भाजपत सर्वांचेच प्रवेश करण्यामागची कारणे, राष्ट्रवादी सोडण्याबद्दलची कारणे या सर्वांचेच विश्लेषण ३ तारखेच्या प्रवेश सोहळ्यात करणार असल्याचे सांगळे म्हणाले. आपल्या सोबत कोण कोण भाजपत जाणार असा प्रश्न केला असता, टप्प्या टप्याने राजकारणातील आपले अनेक सहकारी भाजपत प्रवेश करतील, असे ते म्हणाले.

तर माजी आमदार रामदास चारोस्कर (Ramdas Charoskar) आणि त्यांच्या पत्नी सुनीता चारोस्कर यांच्यासह दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापती, संचालक, आजी माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे चेअरमन, व्हा. चेअरमन त्याचप्रमाणे शिंदेंच्या शिवसेनेचे, ठाकरेंच्या सेनेचे,राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.तसेच दिंडोरी शहरात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण प्रथमच येत असल्याने त्यांचे जंगी स्वागत केले जाणार आहे. दिंडोरी (Dindori) येथे मिरवणूक काढण्यात येणार असून, कार्यकर्त्यांशी देखील संवाद साधला जाणार आहे.

दरम्यान, या दोन्ही पक्षप्रवेश सोहळ्यावेळी आ. देवयानी फरांदे, आ. राहुल ढिकले, डॉ. राहुल आहेर उपस्थित राहणार असून, भाजप प्रवेशामध्ये पक्षाचे महामंत्री विजय चौधरी, संघटन मंत्री रवी अनासपुरे, जिल्हाय्यक्ष सुनील बच्छाव, लक्ष्मण सावजी, विजय साने यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

ताज्या बातम्या

प्रफुल्ल

Praful Patel: राष्ट्रीय नेता निवडीपासून ते पक्षाचे विलिनीकरण, प्रफुल्ल पटेलांनी सगळंच...

0
मुंबई | Mumbaiमाजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी पक्षाच्या नेतृत्त्वाबाबत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. अजित पवार यांच्यानंतर आता राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदी सुनेत्रा...