Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Politics : ठाकरेंची शिवसेना-मनसेच्या युतीची घोषणा होताच नाशिकमध्ये जल्लोष; आता लक्ष...

Nashik Politics : ठाकरेंची शिवसेना-मनसेच्या युतीची घोषणा होताच नाशिकमध्ये जल्लोष; आता लक्ष जागावाटपाकडे

काँग्रेसबाबत संभ्रम कायम

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मुंबईत आज (बुधवारी) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष (Shivsena UBT and MNS) यांच्यातील युतीची अधिकृत घोषणा झाली. मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ही घोषणा होताच नाशिकमध्ये (Nashik) मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. मनसे मुख्यालयासमोर दोन्ही पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन फुगडी खेळत, पेढे वाटत आणि घोषणाबाजी करत आनंद व्यक्त केला.

- Advertisement -

सुमारे १८ वर्षांनंतर ठाकरे बंधू (Thackeray Brothers) एकत्र आल्याने ही युती ऐतिहासिक असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. यावेळी मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील, प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख यांच्यासह शहर व जिल्हा स्तरावरील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच शिवसेना (ठाकरे गट) चे जिल्हाध्यक्ष डी. जी. सूर्यवंशी, महानगरप्रमुख माजी उपमहापौर प्रथमेश गीते यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही युती अत्यंत महत्वाची मानली जात आहे. मराठी मतदारांचे विभाजन थांबवून एकत्रित ताकद उभी करण्याचा हा प्रयत्न असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. युतीमुळे भाजप आणि इतर पक्षांसमोर मोठे आव्हान उभे राहणार असल्याचेही बोलले जात आहे.

YouTube video player

दरम्यान, युतीच्या (Alliance) पुढील रणनीती, जागावाटपाचे सूत्र आणि संयुक्त प्रचार याबाबत लवकरच अधिकृत भूमिका जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. एकूणच शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे यांच्या युतीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणांना सुरुवात झाल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. मात्र नाशिकमध्ये काँग्रेससोबत (Congress) येणार का याबाबत संभ्रम कायम आहे. तर जागावाटपाकडे देखील लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

Imtiaz Jaleel : छत्रपती संभाजीनगरचे वातावरण तापले! इम्तियाज जलील यांच्या गाडीवर...

0
छत्रपती संभाजीनगर । Chhatrapati Sambhajinagar महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उडाला असतानाच शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एमआयएमचे (MIM) प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज...