Friday, September 20, 2024
Homeनगरगतीरोधकावर ट्रकची दुचाकीला धडक; आईचा मृत्यू तर मुलगा जखमी

गतीरोधकावर ट्रकची दुचाकीला धडक; आईचा मृत्यू तर मुलगा जखमी

घारगाव |वार्ताहर| Ghargav

- Advertisement -

गतीरोधकावर दुचाकीचा वेग कमी केल्याने पाठीमागून आलेल्या ट्रकने दुचाकीला (Truck Bike Accident) धडक दिली. या अपघातात आईचा मृत्यू (Mother Death) झाला तर तिचा तरुण मुलगा जखमी (Injured) झाला. ही घटना नाशिक-पुणे महामार्गावर (Nashik Pune Highway) जुन्नर तालुक्यातील आळेफाटा परिसरात मंगळवारी (दि.16 रोजी) रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी प्रतीककुमार सुनील कवडे (वय 27, शनीमंदिर मळा, ओझर, ता.जुन्नर, जि.पुणे) याने दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक चालक मधुकर महादेव वारे (वय 38, रा.हिरडपुरी, ता.पैठण, जि.छत्रपती संभाजीनगर) याचेविरुद्ध आळेफाटा पोलीस ठाण्यात (Alephata Police Station) गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रतीककुमार कवडे व त्याची आई पुष्पा हे दोघे मायलेक मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गाने दुचाकीवरून (क्र. एम.एच.14, ए.टी.756) आळेफाट्याच्या दिशेने येत होते. ते डोंगरे फर्निचर समोर असलेल्या गतीरोधाजवळ आले असता प्रतीककुमारने दुचाकीचा वेग कमी केला. त्याच दरम्यान पाठीमागून आलेल्या चालक चालकाने (क्र. एन.एल.01, ए.एफ.9066) चालक मधुकर वारे याने त्याच्या ताब्यातील ट्रक हयगयीने चालवून त्यांच्या दुचाकीला धडक (Bike Hite) दिली. यात प्रतीककुमारची आई पुष्पा यांना गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू (Death) झाला. या अपघाताचा अधिक तपास पोलीस नाईक शिंगाडे हे करीत आहेत.

दरम्यान पुणे-नाशिक महामार्गावर (Pune Nashik Highway) वाहनाचा वेग नियंत्रित राहावा, हा गतीरोधक उभारण्याचा उद्देश असला तरी सदोष आणि अशास्त्रीय पद्धतीने ठिकठिकाणी उभारण्यात आलेले गतीरोधक महामार्गावर वाहन चालकांसाठी जीवघेणे ठरत आहेत. आळेफाटा बायपासवर सर्वत्र गतीरोधक करताना लांबी, रुंदी, उतार, उंचवटा या कोणत्याही निकषाचे पालन होत नसल्याचे वारंवार गतीरोधकावर होणार्‍या अपघाताने समोर आले आहे. त्यामुळे रस्तानिहाय गतीरोधकाचा आकार, लांबी-रुंदी, उतार आणि उंचवटा बदलत असून, गतीरोधक म्हणजे रस्त्यावरील टेंगूळ ठरत आहेत. परिणामी सदोष गतीरोधकांमुळे काहींना जीव गमवावा लागला, तर काहीजण कायमचे जायबंदी झाले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या