Sunday, September 29, 2024
HomeनाशिकNashik Rain News : नाशकात पावसाची दमदार हजेरी; नागरिकांची तारांबळ

Nashik Rain News : नाशकात पावसाची दमदार हजेरी; नागरिकांची तारांबळ

नाशिक | Nashik

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून परतीच्या पावसाने (Rain) नाशिक शहरासह (Nashik City) जिल्ह्यातील ग्रामीण भागात धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे घरांसह शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तर शहरात उघडझाप पाऊस कोसळत असल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडत आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Accident News : नांदगाव-मनमाड महामार्गावर भीषण अपघात; दोन ठार, ४ जखमी

नाशिक शहरात सकाळी ऊन तर दुपारच्या सुमारास ढग दाटून येऊन पाऊस बरसत आहे. त्यामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ होत आहे. कालप्रमाणेच आज देखील पावसाने नाशिक शहरात दुपारच्या सुमारास हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले आहे.

हे देखील वाचा : मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा रद्द; ‘हे’ आहे कारण

शहरातील नाशिकरोड, मेनरोड, सीबीएस, शालिमारसह आदी परिसरात जोरदार पाऊस बरसला. यामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याचे दिसून आले. तर छत्री व रेनकोट न आणलेल्या नागरिकांनी लपण्यासाठी दुकानांच्या गाळ्यांचा आधार घेतल्याचे दिसून आले.

हे देखील वाचा : मोठी बातमी! संजय राऊतांना मोठा झटका; ‘या’ खटल्यात १५ दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा

आज पालघर आणि नाशिक जिल्ह्याला रेड अलर्ट

किनारपट्टी भागातील कमी दाबाचा पट्टा राज्याच्या उत्तरेकडे सरकल्याने पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबारमध्ये आज जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पालघर आणि नाशकात आज काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. दोन्ही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सोबतच, धुळे, नंदुरबारमध्ये देखील धुव्वाधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुण्यातही विजांच्या कडकडाटासह पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.तर मराठवाडा आणि विदर्भातही विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या