Thursday, September 19, 2024
Homeब्रेकिंग न्यूजNashik Rain Update : जिल्ह्यात पावसाची 'जोर'धार सुरूच; गोदावरीला यंदाच्या मोसमातील दुसरा...

Nashik Rain Update : जिल्ह्यात पावसाची ‘जोर’धार सुरूच; गोदावरीला यंदाच्या मोसमातील दुसरा पूर

दुतोंड्या मारुतीच्या छातीच्या खाली पाणी

नाशिक | Nashik

- Advertisement -

नाशिक जिल्ह्यात (Nashik District) पावसाचा जोर वाढला असून नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये जोरधार सुरू असल्याने गोदावरीच्या पाणीपातळीत पुन्हा मोठी वाढ झाली आहे. गेल्या अमावस्येला म्हणजेच दि. ४ आणि ५ ऑगस्ट रोजी गोदावरीला (Godavari) २०२४ वर्षाच्या मोसमातील पहिला पूर आला होता. त्यानंतर काल २४ ऑगस्टला दुसरा पूर आला असून पूरस्थिती दुसऱ्या दिवशीही कायम आहे.

हे देखील वाचा : Nashik Rain News : नाशकात पावसाची संततधार; गंगापूर धरण इतके ‘टक्के’ भरले

काल सायंकाळी सात वाजता गंगापूर धरणातून (Gangapur Dam) साडेआठ हजार क्यूसेक पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला होता. तसेच गोदावरीच्या कडेला पोलीस बंदोबस्तासह जीवरक्षक तैनात करण्यात आले आहेत. तर गोदावरी तुडुंब बाहू लागल्याने गोदाकाठावरील मंदिरांना पाण्याचा वेळा बसला असून छोटी मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. तसेच रात्री नऊ वाजेपर्यंत दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी पोहोचले होते. त्यानंतर आज सकाळी छातीच्या खाली थोडेसे पाणी आले आहे.

हे देखील वाचा : Nashik Crime News : अटकेची भिती दाखवून दाेघा आयआयटी इंजिनिअरला पाच काेटींचा गंडा

दुसरीकडे जिल्ह्यातील नाशिक, पेठ, सुरगाणा, इगतपुरी, त्र्यंबकेश्वरसह अन्य तालुक्यांत जोरदार पाऊस (Rain) सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १० धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यातील गंगापूर धरणातून ८ हजार ४२८ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरु आहे, तर दारणातून १४ हजार ६७४ क्यूसेक, भावलीतून ५८८ क्यूसेक, भाम धरणातून २ हजार ९९०, गौतमी गोदावरीतून २ हजार ५६०, वालदेवीतून १०७, कडवातून ५ हजार ६२६, आळंदीतून २४३ क्युसेक, भोजापूर धरणांतून २ हजार ८०० क्यूसेक वेगाने विसर्ग सुरू आहे. तर नांदूरमध्यमेश्वरमधून ५२ हजार ३०८ क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग केला जात आहे.

हे देखील वाचा : गोदावरी दुथडी! नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून 52 हजार क्युसेकने विसर्ग

आज नाशिकला ऑरेंज अलर्ट

आज राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यात नाशिकसह पालघर, जळगाव, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदुरबार, पुणे, सातारा या जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर धुळे, नंदुरबार, नगर, अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या