Sunday, January 25, 2026
Homeब्रेकिंग न्यूजChhagan Bhujbal : ...अन् मंत्री छगन भुजबळांनी केली पाण्यात उतरून पूरग्रस्त भागाची...

Chhagan Bhujbal : …अन् मंत्री छगन भुजबळांनी केली पाण्यात उतरून पूरग्रस्त भागाची पाहणी

लासलगाव | वार्ताहर | Lasalgaon

येवल्यासह नाशिक जिल्ह्यात (Nashik District) ढगफुटी सदृश्य पावसाने अनेक नद्या नाल्यांना पूर आलेला आहे. ठीक ठिकाणच्या लोकांना स्थलांतरित करण्याचे काम सुरू आहे. या नैसर्गिक संकटात शासन जनतेच्या सोबत असून बाधित झालेल्या प्रत्येक घटकाला आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्यात येईल. मात्र प्रथमतः पूरग्रस्त भागातील नागरिक तसेच पशूंचे जीव वाचविण्यासाठी प्रशासनाकडून प्रथम प्राधान्य असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Minister Chhagan Bhujbal) यांनी दिली.

- Advertisement -

येवला तालुक्यातील (Yeola Taluka) अंदरसुल येथे कोळगंगा नदीचे पाणी नागरी वस्तीत घुसल्याने अनेक घरांमध्ये पाणी शिरून प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. या भागात मंत्री छगन भुजबळ यांनी प्रत्यक्ष पाण्यात उतरून पाहणी केली. त्यानंतर येवला शहरातील हुडको कॉलनी या रहिवासी भागात घरांमध्ये पाणी शिरले याठिकाणी पाहणी केली.

YouTube video player

दरम्यान, त्यानंतर सावरगाव परिसराची पाहणी करत पाटोदा शहरातील शॉपिंग सेंटर भागातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. तसेच निफाड तालुक्यातील (Niphad Taluka) पाचोरा, मरळगोई, लासलगाव, टाकळी विंचूर येथे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत तातडीने मदत करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

ताज्या बातम्या

Padma Awards 2026 : महाराष्ट्राचे माजी राज्यपाल कोश्यारींना पद्मभूषण तर अभिनेता धर्मेंद्रला...

0
नवी दिल्ली | New Delhi प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यात महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी,दिवंगत...