नाशिक | Nashik
शहरासह जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे जागोजागी पाणी साचले असून, ग्रामीण भागात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच काही गावांचा संपर्क देखील तुटला आहे. तर गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने गोदाघाटावर पूरस्थिती बघायाल मिळत आहे.
गोदाघाटावरील सर्व मंदिरे पाण्याखाली गेली असून, दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पाणी आले आहे. सध्या पावसाचा जोर कायम असल्याने गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील येवला, नांदगाव, मनमाड, त्र्यंबकेश्वर, इगतपुरीसह इतर तालुक्यांत जोरदार पाऊस कोसळत आहे. यात येवल्यातील विंचूर चौफुलीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटरमध्ये पाणी घुसल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तर बल्हेगावात एका पोल्ट्री फॉर्मची भिंत कोसळून सुमारे ८०० कोंबड्या मृत पावल्याने शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसला आहे. याशिवाय तालुक्यातील शेती पिकांचे पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, उंदीरवाडीत ढगफुटी सदृश्य पाऊ




