सुरगाणा | प्रतिनिधी | Surgana
तालुक्यात मागील सात आठ दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या व मुसळधार अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) शेतकऱ्यांचे (Farmer) मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विशेषतः वालवड, घेवडा आणि कांदा या पिकांवर पावसाचा मोठा परिणाम झाला असून, अनेक शेतकरी संकटात सापडले आहेत.
तालुक्याच्या विविध भागांतील शेती (Farm) क्षेत्र जलमय झाले असून, उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः वालवड आणि घेवडा व कांदा ही पिके सडून जाण्याच्या स्थितीत आली आहेत, तर कांद्याची काढणी झालेली उत्पादने देखील खराब झाली आहेत. शेतकऱ्यांनी तातडीने महसूल विभागाने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, पावसामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर (Farmer) नविन संकट कोसळले आहे. स्थानिक प्रशासनाने तत्काळ या भागाचा दौरा करून परिस्थितीची पाहणी करावी व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकरी संघटनांकडून होत आहे.