नाशिक | Nashik
नाशिक शहरासह (Nashik City) जिल्ह्यातील ग्रामीण भागात अवकाळी पाऊस जोरदार हजेरी लावत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. आज (रविवारी) देखील अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) नाशिक शहरात विजांच्या कडकडाटासह तुफान हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.
नाशिक शहरातील मेनरोड, शालिमार, सीबीएस, सिडको, नाशिकरोड, सातपूर यासह विविध भागांत पावसाने (Rain) हजेरी लावली. यामुळे रस्त्यांवर (Road) मोठ्या प्रमाणावर पाणी (Water) साचल्याचे दिसून आले. तर वाऱ्याचा वेग देखील यावेळी मोठ्या प्रमाणावर होता.
यंदा मान्सून केरळात लवकर दाखल होणार
यंदा नैऋत्य मोसमी पाऊस देशात वेळेत दाखल होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे. मान्सून नियोजित तारखेच्या चार दिवस आधी म्हणजेच २७ मे रोजी केरळमध्ये येणार आहे. हवामान विभागाने यासंदर्भात माहिती दिली आहे. दरवर्षी केरळमध्ये मान्सून १ जूनला दाखल होत असतो. यानंतर आता आयएमडीच्या अंदाजानुसार, यावर्षी मान्सून २३ मे ते ३१ मे या कालावधीत येऊ शकतो. तसेच यंदा देशभरात चांगल्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे जून ते सप्टेंबरमध्ये १०५ टक्के पावसाचा अंदाज आहे.