Tuesday, October 22, 2024
HomeनाशिकNashik Rain News : शहरासह जिल्ह्यातील विविध भागांत पावसाची हजेरी; आजपासून जोर...

Nashik Rain News : शहरासह जिल्ह्यातील विविध भागांत पावसाची हजेरी; आजपासून जोर वाढणार

नाशिक | Nashik

राज्याच्या विविध भागात परतीच्या पावसाने (Rain) पुन्हा एकदा धुमाकूळ घातला असून जिल्ह्यात (District) देखील पावसाने हजेरी लावली आहे. आज सकाळी कडक ऊन होते, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर उकाडा जाणवत होता. यानंतर दुपारी अडीच वाजेच्या सुमारास नाशिक शहरातील (Nashik City) काही भागांसह ग्रामीण भागात (Rural Area) पावसाने हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले.

- Advertisement -

हे देखील वाचा : Ajit Pawar : अजित पवारांना आणखी एक धक्का बसणार; माजी मंत्री शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर

जिल्ह्यातील सिन्नर, त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरीसह आदी भागांत पावसाने हजेरी लावली. यात सिन्नरमधील मुसळगाव एमआयडीसी परिसरात ढगांचा गडगडाटासह शहर आणि नांदूर शिंगोटेत दमदार पाऊस कोसळला. त्यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. या पावसामुळे भात पिकांसह (Crop) ग्रामीण भागातील विविध पिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला. तसेच हा परतीचा पाऊस गहू आणि हरभरा पिकांसाठी वरदान ठरणार आहे. रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात गहू आणि हरभरा या पिकांचे उत्पादन घेतले जाते. हा परतीचा पाऊस या दोन पिकांसाठी फायदेशीर आहे. पंरतु, सोयाबीन,उडीद,भाजीपाला, तूर, कांदा या पिकांसाठी हा पाऊस नुकसानकारक आहे.

हे देखील वाचा : महायुतीत वादाची ठिणगी! नांदगाव विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीने ठोकला दावा; समीर भुजबळ मैदानात?

दरम्यान, हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, ९ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबरपर्यंत राज्यातील विविध भागांत पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन, उडीद काढला आहे किंवा केला आहे, त्या शेतकऱ्यांनी ते झाकून ठेवावे, अन्यथा पावसाचा फटका बसू शकतो, असेही सांगण्यात आले आहे.

हे देखील वाचा :  Rahul Gandhi : हरियाणातील पराभवानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “निकाल…”

महाराष्ट्रातील ‘या’ भागांत कोसळणार जोरदार पाऊस

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार,आजपासून मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या भागात रोज भाग बदलत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर १२ ऑक्टोबरपासून विदर्भात पावसाला सुरुवात होणार आहे. तसेच १२ ते १६ ऑक्टोबर या काळात विदर्भात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.याशिवाय नांदेड, परभणी,हिंगोली, लातूर, बीड, जालना या सहा जिल्ह्यांमध्ये जास्त पावसाची शक्यता आहे. तर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नगर, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव या जिल्ह्यातही पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या