नाशिक | Nashik
नाशिक शहरासह (Nashik City) ग्रामीण भागात (Rural Area) आज सकाळपासून ढगाळ वातावरण (Cloudy Weather) बघायला मिळत आहे. त्यातच नाशिक शहरातील इंदिरानगरसह सिन्नर तालुक्यातील (Sinnar Taluka) काही भागांत आज सकाळच्या सुमारास अवकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांची धावपळ झाल्याचे दिसून आले.
हवामान विभागाकडून (Meteorological Department) नाशिक जिल्ह्यासह (Nashik District) उत्तर महाराष्ट्रातील (Uttar Maharashtra) काही भागांना पुढील दोन ते तीन दिवस अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.
तसेच अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) आणि गारपीट झाल्यास याचा विपरीत परिणाम उत्पादनावर होऊ शकतो. याशिवाय कांदा, द्राक्षे, गहू, हरभरा आदी पिकांना देखील फटका बसण्याची शक्यता. त्यामुळे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट ?
ऑरेंज अलर्ट : पुणे, अहिल्यानगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव
यलो अलर्ट : ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर सांगली, सातारा, नंदुरबार, धुळे, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती
एप्रिल ते जून उष्णतेची लाट
एप्रिल ते जून या कालावधीत भारतातील तापमान सामान्यापेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. मध्य आणि पूर्व भारत तसेच उत्तर-पश्चिम मैदानी भागात उष्णतेची लाट अधिक दिवस टिकून राहू शकते. भारतीय हवामानशास्त्र विभागाने ही माहिती दिली आहे.