Thursday, January 8, 2026
HomeUncategorizedNashik Rain News : नाशकात पावसाची 'जोर' धार; नागरिकांची धावपळ

Nashik Rain News : नाशकात पावसाची ‘जोर’ धार; नागरिकांची धावपळ

नाशिक | Nashik

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून नाशिक शहरासह ग्रामीण भागात दुपारच्या सुमारास मोसमी पाऊस (Rain) हजेरी लावत आहे. त्यामुळे नागरिकांची (Citizen) चांगलीच धावपळ होत आहे. सकाळच्या सुमारास वातावरण कोरडे असते. मात्र, दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होऊन ढग दाटून येतात. त्यानंतर पाऊस तासभर मुसळधार हजेरी लावत असून यामुळे शहातील रस्ते जलमय झाल्याचे दिसत आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Sanjay Raut : “अमित शाह उत्तर महाराष्ट्राचा आढावा घेताय याचा अर्थ…”; संजय राऊतांचे टीकास्त्र

YouTube video player

आज दुपारी सव्वा बारा वाजेच्या सुमारास पावसाने शहरातील मेनरोड, शालिमार, सीबीएस, गोदाघाटसह आदी परिसरात हजेरी लावली. त्यामुळे रस्त्यावर पाणीच-पाणी साचल्याचे पाहायला मिळाले. काल दिवसभरात शहरात १०.२ मि.मी. पाऊस झाला असून जिल्ह्यात आतापर्यंत १०१ टक्के पाऊस झाला आहे.तसेच मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत ३.७ मि.मी. तर सायंकाळी पाचपर्यंत १०.९ मि. मी पावसाची नोंद झाली होती.

हे देखील वाचा : संपादकीय : २५ सप्टेंबर २०२४ – आरोग्यपूर्ण आयुष्यासाठी

तर जिल्ह्याचा (District) घाटमाथा व धरण क्षेत्रात होणाऱ्या जोरदार पावसामुळे गोदावरी खोऱ्यातील नद्यांना पुन्हा पूर (Flood) येण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. पुढील पाच दिवस शक्य तेवढ्या शेतमशागती व खरीप पीक काढणीची कामे उरकावीत, असे आवाहन हवामानतज्ञ माणिकराव खुळे यांनी केले आहे.तसेच धरणसाठा ९६.८७ टक्क्यांवर आहे. दारणा, चणकापूर, हरणबारी, केळझर, गिरणा धरणातून विसग सुरु आहे. नागासाक्या धरण मात्र कोरडेच आहे.

हे देखील वाचा : राजेश टोपे अचानक मनोज जरांगेंच्या भेटीला, काय झाली चर्चा?

नाशिकसह ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

हवामान विभागाकडून (IMD) नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांना ‘यलो’ अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पुढील चार दिवस मुसळधार पावसाचे असणार आहेत.तर विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकण याठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. याशिवाय राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट मिळाला आहे. पालघर, ठाणे, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सांगली, सोलापूर, संभाजीनगर, जालना, लातूर, धाराशिव, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम,यवतमाळ, या जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, परभणी, बीड, हिंगोली, नांदेडकरता ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Nashik Crime : पैशांवरून बालमित्रांत वैर; वसुलीसाठी थेट जाळपोळ

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बालपणापासूनची घट्ट मैत्री, वर्षानुवर्षांचा विश्वास आणि त्यातून झालेले कोट्यवधींचे आर्थिक व्यवहार अखेर गंभीर वैरात बदलून थेट जाळपोळीपर्यंत पोहोचल्याची खळबळजनक घटना...