Tuesday, December 3, 2024
HomeनाशिकSanjay Raut : "अमित शाह उत्तर महाराष्ट्राचा आढावा घेताय याचा अर्थ..."; संजय...

Sanjay Raut : “अमित शाह उत्तर महाराष्ट्राचा आढावा घेताय याचा अर्थ…”; संजय राऊतांचे टीकास्त्र

नाशिक | Nashik

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आज नाशिक दौऱ्यावर (Nashik Tour) असून ते उत्तर महाराष्ट्रातील (Uttar Maharashtra) भाजप कार्यकर्त्यांना (BJP Worker) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संबोधित करणार आहेत. मात्र, शाह यांच्या नाशिक दौऱ्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टीकास्त्र सोडले आहे. ते नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते.

- Advertisement -

यावेळी बोलतांना राऊत म्हणाले की, अमित शाह उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या तयारीचा आढावा घ्यायला येतात ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. धोका कुणी कुणाला दिला हे महाराष्ट्र (Maharashtra) जाणते म्हणून लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने भाजपचा हिशोब चुकता केला. उद्धव ठाकरे यांनी धोका दिला नसून स्वत:अमित शाह यांनी महाराष्ट्राला आणि शिवसेनेला धोका दिला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत जी चर्चा झाली. जे शब्द दिले घेतले. त्याबाबत धोकेबाजी ही अमित शाह यांनी केली आहे. त्यामुळे राज्यातील जनता कुणावर विश्वास ठेवते हे नव्याने सांगायला नको, असे संजय राऊत यांनी म्हटले.

पुढे बोलतांना राऊत म्हणाले की, अमित शाह मणिपूरला (Manipur) आढावा घ्यायला गेले नाहीत, काश्मीरच्या सीमेवर आढावा घ्यायला गेले नाहीत, लडाखमध्ये चीनचे सैन्य घुसले त्याचा आढावा नाही. अरुणाचल प्रदेशात चीनचे सैन्य ६० किमी आत घुसलं आहे त्याचा आढावा नाही. पण, उत्तर महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घ्यायला देशाचे गृहमंत्री गृहखात्याचे विशेष विमान घेऊन येतात याचा अर्थ महाराष्ट्रात भाजपची खटीया खडी होतेय,असे संजय राऊतांनी म्हटले.

ते पुढे म्हणाले की, भाजपचा इतिहास वापरा आणि फेका असा आहे. सर्वप्रथम अजित पवारांचा (Ajit Pawar) काटा काढला जाईल. २०२४ नंतर आताच्या मुख्यमंत्र्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा काटा काढला जाईल. महाराष्ट्राची निवडणूक, हरियाणाची निवडणूक त्यांच्या हातातून गेलेली आहे. महाराष्ट्र ज्या दिवशी हारतील त्या दिवशी मोदींची पंतप्रधानपदाच्या खूर्चीवरुन उतरण्याची क्रिया-प्रक्रिया सुरु झालेली असेल. विनोबा भावे यांची सब भूमी गोपाल की अशी घोषणा होती. आता भाजपच्या राज्यात सर्व भूमी देवा भाऊ की अन् ती त्यांना वाटेल त्यांना दिली जातेय, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र

अमित शाह यांचा मुलगा जरी महाराष्ट्रात आला तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) त्यांच्या स्वागताला जातील. लाचार, लोचट, स्वाभिमानी शून्य सरकार या ठिकाणी बसवल्यावर ते आपल्या उपकारकर्त्याच्या स्वागतासाठी हजर राहणारच. अमित शाह भाजपच्या आढावा बैठकीसाठी येत आहेत आणि त्यांच्या स्वागताला मुख्यमंत्री येणार असं त्यांच्या लोकांनी सांगितले आहे. म्हणजे मुख्यमंत्री दिल्लीची किती चाटूगिरी करत आहेत. हे दिसते आहे, असं राऊत म्हणाले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या