कोहोर | वार्ताहर | Kohar
पेठ तालुक्यासह (Peth Taluka) कोहोर परिसरात आठवडाभरापासून तुरळक पडणाऱ्या पावसांनी (Rain) काल (दि.२२ रोजी) रात्री पासून पेठ तालुक्यासह सीमावर्ती भागात जोरदार हजेरी लावली. परतीच्या वाटेवर असलेल्या या पावसाचा अनेक ठिकाणी फटका बसला आहे. अशातच नवरात्रोत्सवात पावसाने पहिल्याच दिवसापासून हजेरी लावल्याने भक्तांचा दर्शनासाठी अनेकांचा हिरमोड झाला आहे.
तालुक्यात डोंगराळ आणि सीमावर्ती भागात पावसाची संततधार कायम सुरू असून नदी, ओढा-नाल्यांना (Rivers and Drains) मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. त्यामुळे काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. तालुक्याच्या ठिकाणी नियमित ये-जा करणाऱ्या वाहनधारकांसह नागरिकांचा संपर्क तुटला आहे.
तसेच नागरिकांनी वाहत्या पुरातून पलीकडे जाण्याचा प्रयत्न करु नये, असे आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाकडून वेळोवेळी सांगण्यात येत आहे. तर प्रादेशिक हवामान खात्याने (IMD) स्पष्ट केले आहे की, राज्यात (State) पुढील आठवडाभरात पाऊस आणि वादळ यांची शक्यता अधिक असणार आहे, असे वर्तवण्यात आले आहे.




