नाशिक | Nashik
गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरातून (Nashik City) विश्रांती घेतलेल्या पावसाने (Rain) आज दुपारच्या सुमारास जोरदार हजेरी लावली. अवघ्या तासभर आलेल्या या पावसामुळे शहरातील ठिकठिकाणचे रस्ते तुंबल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे नागरिकांना गाडी चालवतांना चांगलीच कसरत करावी लागली.
हे देखील वाचा : Nashik Rain News : नाशकात पावसाची जोरदार हजेरी; रस्त्यांवर पाणीच पाणी
पावसाने आज शहरातील मेनरोड, रामकुंड, फुलबाजार, सराफबाजार, द्वारका, सिडको, सातपूर, नाशिकरोडसह आदी भागांत तासभर मुसळधार हजेरी लावली. त्यामुळे जागोजागी रस्ते (Road) तुंबल्याचे पाहायला मिळाले. तसेच या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी देखील झाल्याचे दिसून आले. यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात आला.
हे देखील वाचा : Rain News : सिन्नर शहरासह तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी
दुसरीकडे अचानक आलेल्या या पावसामुळे छत्री व रेनकोट न आणलेल्या नागरिकांनी (Citizen) पावसापासून लपण्यासाठी ठिकठिकाणी दुकानांच्या गाळ्यांचा आडोसा घेतल्याचे दिसून आले. तसेच काल देखील पावसाने नाशकातील काही भागांत तुरळक हजेरी लावली होती. मात्र, आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास नाशकात तुफान पाऊस बरसताना दिसून आला.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा