Wednesday, January 7, 2026
HomeनाशिकNashik Rain Update: धुव्वाधार पावसामुळे इगतपुरीत जनजीवन विस्कळीत; रस्त्यांना तळ्याचे स्वरुप

Nashik Rain Update: धुव्वाधार पावसामुळे इगतपुरीत जनजीवन विस्कळीत; रस्त्यांना तळ्याचे स्वरुप

इगतपुरी । प्रतिनिधी
पावसाचे माहेरघर ओळखल्या जाणाऱ्या इगतपुरी तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने चांगलीच जोरदार हजेरी लावली आहे. तीन दिवसांपासून पडणाऱ्या संततधार पावसामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे. शेतकरी भात लागवडीसाठीच्या कामात व्यस्त झाला आहे. धो धो आलेल्या पावसामुळे नागरिकांचे जनजीवन मात्र विस्कळीत झाले असुन बाजारात शुकशुकाट जाणवत आहे.

सोमवार पासुन शाळा सुरु झाली असुन या पावसामुळे शाळकरी विद्यार्थी व पालकांचे चांगलेच हाल होतांना दिसुन आले. संपूर्ण शहरात नळ कनेक्शनसाठी रस्ता खोदुन ठेवल्याने या खड्यात पाणी साठत असल्याने चालतांना अनेक विद्यार्थी या खड्यात पडले होते. पावसामुळे काही ठिकाणी विद्युत पोल पडले तर काही ठिकाणी वायर तुटल्याने शहरातील विविध भागात १० ते १२ तास विद्युत पुरवठा खंडित झाला होता. या खंडीत झालेल्या विद्युत पुरवठ्यामुळे शहरातील अनेक भागात नगरपरिषदेला पाणी पुरवठा करता न आल्याने भर पावळ्यात नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध झाले नाही. तर मोबाईल चार्जिंग नसल्याने नागरिकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागला. महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडे विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी पुरेसी साधन सामुग्री नसल्याने त्यांनाही विद्युत पुरवठा सुरू करण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागत आहे. पावसामुळे नाशिक व मुंबईला जाणाऱ्या चाकरमानी यांची हाल होताना दिसुन आले. तर ऐन पावसाळ्याच्या तोंडावर इगतपुरी नगरपरिषदेचे आरोग्य खाते व्हेंटिलेटरवर असल्याचे दिसत असुन अनेक ठिकाणी नाले व गटारींची साफसफाई न केल्याने शहरातील अनेक भागात पावसाचे पाणी तुंबत असल्याने विद्यार्थी व नागरिकांना जीव मुठीत घेऊन रस्त्यावरून मार्गक्रमण करावे लागत आहे.

- Advertisement -

धुव्वाधार पावसामुळे इगतपुरीत जनजीवन विस्कळित; रस्त्यांना तळ्याचे स्वरुप

YouTube video player

 

तालुक्यात १६ जून पासून पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्गाने भात लागवडीला सुरुवात केली असुन भात पेरणीला वेग आला आहे. दरम्यान तालुक्यातील मानवेढे, पिंपरी, भावली नांदगाव सदो, तळेगाव,आदुर्पदा ,चिंचलेखैरे, कराची वाडी, कथ्रुवगन, आंबेवाडी, जामुंडे, घोटी, गोंदे दुमाला, वाडीवऱ्हे,आदी भागात जोरदार वाऱ्यासह पाऊस होत असून खेडेगावातील जनजीवन विस्कळीत झाले असल्याचे चित्र दिसत पहावयास मिळाले. पावसामुळे डोंगरावर, नद्या, नाले, झरे आदी ओसांडून वाहत आहेत. पाऊस सुरू झाल्याने महामार्गावरील कसारा घाट व महामार्ग धुक्यात हरवला आहे. इगतपुरी कसारा दरम्यान दरवर्षीच मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने कसारा घाट व महामार्ग धुक्याने वेढलेला असून मुंबईहून नाशिक कडे जाणाऱ्या व नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या वाहन चालकांना भरदिवसा धुक्यामुळे हेड लाईट लाऊन वाहन चालवताना घाटात मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागत असून संथ गतीने प्रवास करावा लागत आहे. तर शहरात धुक्याची चादर पसरली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

अपघाताचा बनाव उघड, तपासात खून असल्याचे स्पष्ट

0
त्र्यंबकेश्वर | वार्ताहर Trimbakeshwar जुन्या अपघाताच्या गुन्ह्याचा तपास करताना तो अपघात नसून खून असल्याचे निष्पन्न झाल्याने सराईत आरोपीस अटक करण्यात आली आहे. त्रंबकेश्वर...