Thursday, February 13, 2025
Homeनाशिकझाले गेले विसरून जा! आजी-माजी खासदारांची गळाभेट

झाले गेले विसरून जा! आजी-माजी खासदारांची गळाभेट

नाशिक रोड । प्रतिनिधी

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे हे नाशिक लोकसभा मतदार संघातून प्रचंड मताने विजयी झाले.

- Advertisement -

त्यांनी आपले प्रतिस्पर्धी महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांचा पराभव केला. या निकालानंतर हे दोघेही जण पुन्हा राजकीय पक्षाच्या कार्यक्रमात सक्रिय दिसून येत आहे.

शुक्रवारी नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी विद्यमान खासदार राजाभाऊ वाजे व माजी खासदार हेमंत गोडसे आपल्या उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी महसूल आयुक्त कार्यालयात आले असता या दोघांची समोरासमोर भेट झाली.

त्यानंतर त्यांनी झाले गेले विसरून जा असा संदेश देऊन एकमेकाची गळा भेट घेतली. त्यांच्या या गळाभेटीने सर्वजण आश्चर्यचकित झाले. याप्रसंगी पालकमंत्री दादा भुसे तसेच विजय करंजकर, राजू लवटे आदी उपस्थित होते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या