Thursday, February 5, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik News : हवाई मालवाहतुकीत नाशिकची दमदार कामगिरी

Nashik News : हवाई मालवाहतुकीत नाशिकची दमदार कामगिरी

भारतात अकराव्या, महाराष्ट्रात दुसऱ्या स्थानावर

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिकच्या (Nashik) औद्योगिक आणि निर्यात क्षमतेला आणखी एक मान्यता मिळाली असून, मे २०२५ मध्ये नाशिक विमानतळाने (Nashik Air Port) एकूण १,१४६ मेट्रिक टन आंतरराष्ट्रीय मालवाहतूक करून देशभरात ११ व्या क्रमांकाचे स्थान मिळवले आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्रात (Maharashtra) मुंबईनंतर नाशिकने दूसरे स्थान पटकावले आहे. नाशिकसाठी हा ऐतिहासिक टप्पा ठरला आहे.

- Advertisement -

या नव्या क्रमवारीने नाशिकने आंतरराष्ट्रीय व्यापारात (International Trade) मालवाहतुकीच्या माध्यमातून स्वतः ची एक ओळख निर्माण केली असून देशाच्या अन्य शहरांच्या तुलनेत नाशिकने एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. आतापर्यंत मेट्रो शहरांतच (Metro City) कार्गो वाहतूक मर्यादित होती. मात्र, आता नाशिकसारख्या शहरांकडूनही देशाच्या निर्यात क्षमतेत भरीव योगदान दिले जात असल्याचे या आकडेवारीतून सिद्ध होत आहे.

YouTube video player

औद्योगिक विकासाला चालना

नाशिकचे हे यश महानगरातील वाढती निर्यात, औद्योगिक विस्तार आणि सुसज्ज मालवाहतूक सुविधा यांचे फलित मानले जात आहे. एचएएलच्या ओझर विमानतळावरून चालणाऱ्या इंडिगो व तत्सम सेवांमुळे अनेक स्थानिक उत्पादक थेट परदेशी बाजारपेठांत पोहोचू शकले आहेत. विशेषतः कृषी प्रक्रिया, फार्मा, प्लास्टिक, इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रिकल उत्पादक यांना याचा मोठा फायदा झाला आहे.

अधिक सुविधा अपेक्षित

नाशिकच्या हवाई मालवाहतूक कामगिरीकडे सरकारने लक्ष पुरवून अधिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नाशिकच्या उद्योजकांनी केली आहे. त्यात प्रामुख्याने मालवाहतूक टर्मिनलचे आधुनिकीकरण, २४७ कस्टम सुविधा, थेट आंतरराष्ट्रीय फ्लाइट्ससाठी प्रयत्न, मल्टिमोडल लॉजिस्टिक्स हब उभारणीला गती देणे या मागण्यांचा समावेश आहे. त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाणार आहे, असे निमा अध्यक्ष आशिष नहार यांनी सांगितले.

मुंबईनंतर महाराष्ट्रात दुसरे आणि देशात ११वे स्थान पटकावणाऱ्या नाशिक विमानतळासाठी हा क्षण ऐतिहासिक असून, योग्य धोरणात्मक पाठबळ मिळाल्यास नाशिक लवकरच ‘कार्गो हब’ म्हणून उदयास येईल.

मनीष रावल, अध्यक्ष एव्हिएशन उपसमिती, निमा

देशातील आंतरराष्ट्रीय मालवाहतूक (मे २०२५ उलाढाल)

विमानतळ मेट्रिक टन
दिल्ली ६१,११२.४
मुंबई ५८,४६१.२
चेन्नई २८,२०७.९
बेंगळूरु २७,९९२
हैदराबाद ७,८२०.७
अहमदाबाद ५,२५८.८
कोची ४,६१२.९
कोलकाता ३,७५४.१
कोझिकोड १,८०५.५
तिरुवनंतपुरम १,६६७.९
नाशिक १,१४६
लखनऊ ६०२.९
तिरुचिरापल्ली ५८८.८
कनूर ४२१.३
जयपूर ९५.५

ताज्या बातम्या

Accident News : राहुरी विद्यापीठाजवळील अपघातात जखमी महिलेचा मृत्यू

0
राहुरी |प्रतिनिधी| Rahuri राहुरी कृषी विद्यापीठाजवळ नगर-मनमाड महामार्गावर 2 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या वेळी झालेल्या एका भीषण रस्ता अपघातात गंभीर जखमी झालेल्या 50 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान...