Sunday, September 22, 2024
Homeमुख्य बातम्याशुक्रवारपासून नाशिकरोड प्रॉपर्टी एक्स्पो

शुक्रवारपासून नाशिकरोड प्रॉपर्टी एक्स्पो

नाशिक । प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

दैनिक ‘देशदूत’ आयोजित व दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रस्तुत ‘नाशिकरोड प्रॉपर्टी एक्स्पो 2023’ च्या (Nashikroad Propery Expo-2023 )माध्यमातून सामान्यांचे गृहस्वप्न साकार करण्याची सुवर्णसंधी ‘देशदूत’ने उपलब्ध करून दिली आहे.

शुक्रवार दि. 27 ते रविवार दि. 29 जानेवारी पर्यंत नाशिकरोड, जेलरोड येथील मनपा आरक्षित नियोजित नाट्यगृह जागेच्या मोकळ्या भूखंडावर प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. दुपारी 3 ते रात्री 9 वाजेपर्यंत सर्व नागरिकांना येथे खुला प्रवेश असेल.पहिले घर घेऊ इच्छिणार्‍यांसाठी तसेच सध्या घर असलेल्या परंतु, नव्या घराच्या शोधात असलेल्यांसाठी या प्रदर्शनात अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

नाशिकरोड शहराने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. भौगोलिक विस्तार पाहता शहराच्या डेड एण्डपर्यंत नागरी वसाहतींचे जाळे पसरल्याचे दिसून येते. सरकारी, निमसरकारी आस्थापना, शाळा, महाविद्यालय, न्यायालय, टोलेजंग मॉल्स, मुख्य बाजारपेठ, शेतीप्रधान परिसर आणि माळेगाव, शिंदे, सिन्नर औद्योगिक वसाहतींना कनेक्ट असणारा नाशिक-पुणे महामार्ग यामुळे रहिवासी क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ होत आहे. याशिवाय वेगवानरस्ते, रेल्वे आणि विमानसेवेमुळे शहराची कनेक्टिव्हिटी वाढली आहे.

आगामी निओ मेट्रो, आयटी पार्क, लॉजिस्टिक पार्क यांसारखे अनेक प्रकल्प येणार आहेत. त्यामुळे विकासाला चालना मिळणार आहे. भविष्याचा विचार करता रिअल इस्टेट क्षेत्रात नाशिकमध्ये गुंतवणूक करण्यासाठी हीच योग्य वेळ असल्याचे बोलले जात आहे. घर असो वा दुकान सर्व गृह तसेच व्यावसायिक प्रकल्पांची माहिती नागरिकांना एकाच छताखाली मेथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या प्रदर्शनात नाशिक शहरातील दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, ऋषिकेश बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, आदित्य डेव्हलपर्स, ए. सी. जैन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, विश्वकर्मा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, श्री ओम बिल्डकॉन, शहाणे इन्फ्रा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, कृपासिंधु बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, वरद रेसिडेन्सी आणि सुयश कन्स्ट्रवेल इत्यादी नामांकित बिल्डर्स सहभागी झाले आहेत.

तीन दिवसांत दररोज लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. भाग्यवान विजेत्यास सोनी गिफ्ट्स तर्फे रोज आकर्षक बक्षिसे मिळणार आहेत. सोनी गिफ्टस् प्रा. लि. हे गिफ्ट पार्टनर तर, स्पायडर मीडिया हाऊस हे प्रदर्शनाचे इव्हेंट पार्टनर आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी प्रदर्शनास भेट देऊन आपल्या गृहस्वप्नपूर्तीकडे पाऊल टाकावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या