Thursday, March 13, 2025
Homeनगरजिल्हा बँकेच्या अडचणी वाढण्याची चिन्हे!

जिल्हा बँकेच्या अडचणी वाढण्याची चिन्हे!

अहमदनगर| पारनेर |तालुका प्रतिनिधी| Ahmednagar|Parner

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये करण्यात येणार्‍या 700 जागाच्या कर्मचारी भरतीच्या प्रक्रियेस स्थगिती देण्याची मागणी खा. नीलेश लंके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. दुसरीकडे जिल्हा बँकेच्या कारभारास कर्जप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी बँकेचे ज्येष्ठ सभासद व विशेष सरकारी वकील सुरेश लगड यांनी सहकार मंत्री दिलीप वळसे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. यामुळे जिल्हा बँके अडचणीत सापडण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.

- Advertisement -

जिल्हा बँकेच्या भरतीबाबत खा. लंके यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले, बँकेच्यावतीने भरतीसाठी नेमण्यात आलेल्या वर्कवेल कंपनीचा सहकार आयुक्तालयाने बेकायदेशीरपणे पॅनलावर समावेश केला असून राज्यातील अनेक विभागांच्या भरती प्रक्रीयेसाठी या कंपनीची निवड करण्यात आली आहे. जिल्हा बँकेच्या भरतीसाठी निवड करण्यात आलेल्या कंपनीचा अनुभव तोडका आहे. यामुळे जिल्हा बँकेची भरती सदोष होण्याची चिन्हे असल्याचा दावा खा. लंके यांनी केला आहे. तसेच जिल्हा सहकारी बँकेने सहकारी साखर कारखान्यांना बेकायदेशीर कर्ज वितरण, बँकेचा सीडी रेशो यासह बँकेच्या अधिकार्‍यांच्या नेमणुकीवर खा. लंके यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

बँकेच्या कारभाराचे अनेक अपारदर्शक मुद्देसमोर आले असून जिल्हा बँकेने राज्य सहकारी बँकेत ठेवलेल्या मुदत ठेवी जवळपास एक हजार कोटींनी घटल्या आहेत. बँकेने राज्य सहकारी बँकेतून एव्हढ्या मोठ्या रक्कमा कशासाठी काढल्या, काढलेल्या ठेवीचे विनियोग कशासाठी केला ? या ठेवी काढल्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या लिक्विडीटीवर परिणाम झाला आहे. ही बाब गंभीर असून बँकेने ओव्हर ट्रेडींग केलेले आहे. त्यामुळे या प्रकरणाची मुख्यमंत्री व सहकार मंत्री यांनी चौकशी करावी, अशी मागणी अ‍ॅड. लगड यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...