Monday, November 16, 2026
Homeक्राईमNashik Shalartha ID Scam: घोटाळ्यातील तपासाची चक्रे अधिक तीव्र; आयडी मिळवणारे बनावट...

Nashik Shalartha ID Scam: घोटाळ्यातील तपासाची चक्रे अधिक तीव्र; आयडी मिळवणारे बनावट शिक्षक-कर्मचारी पोलिसांच्या रडारवर

शिक्षण संस्थाचालक व भाजप पदाधिकारी संजय गरूड याने जामिनासाठी पुन्हा धावपळ सुरू

नाशिक | प्रतिनिधी
बहुचर्चित शालार्थ घोटाळ्यातील तपासाची चक्रे अधिक तीव्र झाली असून, आयडी मिळवणारे बनावट शिक्षक व कर्मचारी आता पोलिसांच्या रडारवर आले आहेत. नाशिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात रोज संबंधितांची कसून चौकशी सुरू आहे. दुसरीकडे, या गुन्ह्यातील मुख्य संशयित, शिक्षण संस्थाचालक व भाजप पदाधिकारी संजय गरूड याने जामिनासाठी पुन्हा धावपळ सुरू केली असून, नाशिकरोड न्यायालयात नवीन वकिलांमार्फत जामीन अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर ३० सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

नाशिक विभागातील एकूण ८४१ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडी बनावट असल्याचे निष्पन्न झाले असून, त्यात एकट्या जळगाव जिल्ह्यातील तब्बल ६३८ जणांचा समावेश आहे.

- Advertisement -

Nashik Ganesh Visarjan News: वीस मिनिटांत चौक रिकामा करावा लागणार ! विसर्जन मिरवणुकीवर पोलिसांचा वॉच; डीजे आणि दोरखंडांच्या अतिवापरावर कारवाई

या प्रकरणात आतापर्यंत राज्य शिक्षण मंडळाचा सेवानिवृत्त अध्यक्ष संशयित नितीन उपासनी, माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर, शिक्षण संस्थाचालक प्रशांत वाडीले, भाजप पदाधिकारी संजय गरूड, दीपक गरूड, लॅब असिस्टंट तुषार साळुंके यांच्यासह आठ जणांना अटक करण्यात आली आहे.

गरूडला घेणार ताब्यात ?
अटक झाल्यापासून वैद्यकीय कारणास्तव जिल्हा रुग्णालयातील मध्यवर्ती कारागृह कक्षात उपचार घेणारा संजय गरूड सध्या नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात आहे. त्याची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक त्याला पुन्हा ताब्यात घेण्याची मागणी न्यायालयाकडे करण्याच्या तयारीत आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : 2006 च्या दिव्यांग भरतीतील 70 शिक्षकांची मूळ फाईलच गायब

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील 2006 मधील विशेष दिव्यांग शिक्षक भरतीचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. या भरतीशी संबंधित 70 शिक्षकांच्या मूळ...