नाशिक | प्रतिनिधी
मुख्य विसर्जन मिरवणुकीत (Nashik Ganesh Visarjan Miraunuk) यंदा पोलिसांनी शिस्तीचा नवा फॉर्म्युला लागू केला आहे. मिरवणुकीत विनाकारण रेंगाळणाऱ्या मंडळांना आणि मुख्य चौकांचा ताबा घेणाऱ्या ढोल-ताशा पथकांना आता प्रत्येक चौकात केवळ २० मिनिटांचा टाइम स्लॉट मिळणार आहे. एवढेच नाही, तर दोन मंडळामध्य अंतर पडल्यास संबंधित मंडळावर उत्सवानंतर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याने गणेश मंडळांना बंदा वेळेचे काटेकोर भान ठेवावे लागणार आहे.
दरवर्षी विसर्जन मिरवणुकीत काही मंडळे आणि ढोल-ताशा पथके मुख्य चौकांमध्ये तासन तास थांबून राहतात. परिणामी, मागील मंडळांना उशीर होतो आणि मिरवणुकीचा खोळंबा होतो. ही कोंडी फोडण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी हे विशेष नियोजन केले आहे. चौकातून वेळेत पुढे न जाणाऱ्या आणि गर्दी अडवून धरणार्या पथकांना शिस्त लावण्यासाठी ही वेळमर्यादा लागू करण्यात आली आहे. भाविकांना मिरवणूक पाहताना ढोल पथकांच्या अतिप्रमाणातील दोरखंडांचा त्रास होतो. त्यामुळे ढोल-ताशा पथकांना वादकांची संख्या मर्यादित ठेवण्याचे आणि रस्ता जास्त वेळ न अडविण्याचे निर्देश देण्यात आले आ हेत. तसेच, डोळ्यांना घातक ठरणाऱ्या लेझर लाईट्स आणि डीजेवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून ध्वनीमयदिचे पालन होते की नाही, याची जागेवरच तपासणी केली जाणार आहे.
अशी होईल मिरवणुक
» सकाळी १० वा. : वाकडी बारव येथे गणेश मंडळांचे रथ, देखावे व मूर्ती एकत्र जमणार.
» सकाळी ११ वा.: मुख्य गणेश विसर्जन मिरवणुकीला औपचारिक प्रारंभ.
» रात्री १२ वा. : मुख्य मिरवणूक संपन्न होईल. यानंतर फक्त गणेशमूर्ती विसर्जनस्थळी नेण्यास परवानगी असेल.
पोलिसांचे ऑन-फील्ड नियोजन
मिरवणुकीत अंतर पडू नये यासाठी प्रत्येक गणेश मंडळासोबत एक पोलीस अधिकारी तैनात असेल.
संपूर्ण मिरवणूक मार्गावर नियंत्रण कक्ष आणि पोलिस ठाण्यातून थेट ड्रोन व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या साहाय्याने वाँच
मिरवणूक मार्गाभोवती बॅरिकेडिंग असेल. तसेच राजकीय वा सामाजिक स्वागत कक्षांमधून अनावश्यक गाणी वाजवण्यास मनाई आहे.




