Wednesday, April 30, 2025
Homeब्रेकिंग न्यूजNashik : आर्टिलरी सेंटरमध्ये सरावादरम्यान ताेफगाेळ्याचा स्फाेट; दाेन अग्नीवीरांचा मृत्यू; एक जखमी

Nashik : आर्टिलरी सेंटरमध्ये सरावादरम्यान ताेफगाेळ्याचा स्फाेट; दाेन अग्नीवीरांचा मृत्यू; एक जखमी

नाशिक। प्रतिनिधी Nashik

देवळाली कॅम्प येथील लष्कराच्या अर्टिलरी सेंटरमध्ये तोफांच्या सरावादरम्यान झालेल्या स्फोटात दाेन अग्नीवीर जवान मृत्युमुखी पडले आहेत, तर तिसरा जवान गंभीर जखमी झाला आहे. फुटलेल्या बॉम्बचे लाेखंडी पत्रे, तुकडे शरीरात घुसल्याने दोघांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. याबाबत देवळाली कॅम्प पोलिस पुढील तपास करीत आहेत.

- Advertisement -

गोहिल विश्वराज सिंग (वय २०, रा. कोलकाता, पश्चिम बंगाल) आणि सैफत शित (२१, रा. जामनगर, गुजरात) अशी मृत्यू झालेल्या अग्निवीरांची नावे आहेत. तर अप्पा स्वामी हा अग्निवीर जखमी असून उपचार सुरु आहेत.

गुरुवारी (दि. १०) दुपारी बारा वाजेच्या सुमारास ‘फायरिंग’च्या सरावावेळी स्फोट झाल्याने जखमी झालेल्या गोहित, सैफत व अप्पा यांना नाईक सचिन चव्हाण, नायब सुभेदार सुदेश मामेन, सुंदरराज यांनी लष्करी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वी गोहिल व सैफत यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : ३० एप्रिल २०२५ – लोकांची साथ आवश्यक

0
सर्व प्रकारचे प्रदूषण वाढत आहे. त्याला आळा घालण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न केला जात असल्याचे सरकारकडून वेळोवेळी सांगितले जाते. तथापि असे प्रयत्न लोकांच्या इच्छाशक्तीशिवाय प्रभावी...