Monday, September 28, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik News: घाट क्षमतेनुसारच वाहनांना प्रवेश; डेटा-आधारित सिंहस्थ आराखड्यावर भर

Nashik News: घाट क्षमतेनुसारच वाहनांना प्रवेश; डेटा-आधारित सिंहस्थ आराखड्यावर भर

नाशिक | प्रतिनिधी
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यातील (Nashik Sinhastha Kumbha mela) भाविकांच्या प्रचंड गर्दीचे प्रभावी व्यवस्थापन (Crowd Management) करण्यासाठी घाटाच्या प्रत्यक्ष वहनक्षमतेनुसारच शहरात वाहनांना प्रवेश देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मोबिलिटी, पार्किंग आणि साधग्रामचा अंतिम आराखडा वैज्ञानिक माहिती (डेटा-बेस्ड) आणि वाहतूक विश्लेषणाच्या आधारे तयार करण्यात येणार असल्याचे कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी स्पष्ट केले. विभागीय आयुक्त कार्यालयात उच्चस्तरीय झालेल्या बैठकीत (Sinhastha Kumbha Mela Reivew Meeting) त्यांनी संबंधित विभागांना आवश्यक निर्देश दिले.

कुंभमेळा बैठकीस प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, विशेष पोलीस महानिरीक्षक संजय येनपुरे, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

यावेळी शेखर सिंह यांनी पार्किंग आणि साधुग्राम आराखड्याचे सादरीकरण केले. घाटांबर सुरक्षितरीत्या हाताळता येईल, तेवढ्याच भाविकांच्या वाहनांना शहरात प्रवेश दिला जाईल. गर्दी नियंत्रणासाठी धुळे, मालेगाव, संगमनेर आणि सिन्नर येथे बाहनांसाठी होल्डिंग एरिया विकसित करण्यात येणार आहेत. तसेच २ ऑगस्ट २०२७रोजी होणाऱ्या सूर्यग्रहणाच्या विशेष स्नानासाठी स्वतंत्र आपत्कालीन नियोजन करण्यात येणार आहे.

Nashik Crime News: राज्यात ५५ हजार फॉरेन्सिक अहवाल प्रलंबित, नाशिकसह राज्यभरातील प्रयोगशाळांवर कामाचा प्रचंड ताण

डिजिटल नोंदणी व ‘ड्रॉप अँड रिटर्न’ व्यवस्था
सिंहस्थ काळात बाहेरील बस केवळ आउटर पार्किंगपर्यंतच येतील. तेथून त्र्यंबकेश्वर आणि मुख्य स्नानस्थळांसाठी शटल बस, कॅब व ई-रिक्षांची नियंत्रित सेवा उपलब्ध असेल, घाट परिसरात खासगी वाहनांना प्रवेश किंवा पार्किंगला परवानगी दिली जाणार नाही. हॉटेल आणि ट्रॅव्हल बससाठी ड्रॉप अँड रिटर्न प्रणाली राबविण्यात येणार असून, भाविकांना उतरवल्यानंतर बस पूर्वनियोजित ठिकाणी परत जातील.

साधुग्राम नियोजनाला प्राधान्य
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील साधुग्राममध्ये अखाड्यांच्या पारंपरिक स्थानांचा सन्मान राखत अतिरिक्त जागा, रिंगरोड आणि स्वतंत्र ड्रेनेज व्यवस्थेचा आराखडा तयार केला जाणार आहे. घाटांची जास्तीत जास्त लांबी सर्वसामान्य भाविकांसाठी खुली ठेवून सुरक्षित आणि सुयोग्य सुविधा उपलब्ध करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी कामांना गती द्यावी, असे निर्देश डॉ. गेडाम यांनी दिले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेच्या जनरलच्या 7 जागा बिनविरोध होण्याची शक्यता

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट गडद होत असताना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मात्र राजकीय वातावरण तापण्याआधीच समझोत्याचे सूर उमटू लागले आहेत. रविवारी संगमनेर...