Friday, July 31, 2026
Homeक्राईमNashik Crime News: राज्यात ५५ हजार फॉरेन्सिक अहवाल प्रलंबित, नाशिकसह राज्यभरातील प्रयोगशाळांवर...

Nashik Crime News: राज्यात ५५ हजार फॉरेन्सिक अहवाल प्रलंबित, नाशिकसह राज्यभरातील प्रयोगशाळांवर कामाचा प्रचंड ताण

नाशिक | भारत पगारे
गुन्ह्यांची उकल करण्यासाठी आणि आरोपींना न्यायालयात कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या फॉरेन्सिक सायन्स विभागावर सध्या कामाचा प्रचंड ताण पडला आहे. जून २०२६ मध्ये राज्यभरातील प्रयोगशाळांनी तब्बल ३१,६५२ प्रकरणांचे अहवाल पोलिसांकडे सोपवले. मात्र, दरमहा येणाऱ्या नवीन गुन्ह्यांच्या सुटसुट्या प्रवाहामुळे १ जुलै २०२६ पर्यंत तब्बल ५५,८७२ गुन्ह्यांचे फॉरेन्सिक अहवाल प्रलंबित राहिल्याचे वास्तव समोर आले आहे.

३१ मे अखेर राज्यात ५३,७४१ प्रकरणे प्रलंबित होती. जून महिन्यात त्यात आणखी ३३,७८३ नवीन केसेसची भर पडली. फॉरेन्सिक तज्ज्ञांनी ३१,६५२ प्रकरणांचा यशस्वी निपटारा केला असला, तरी पेंडन्सी घटण्याऐवजी उलट २,१३१ ने वाढली आहे. याचा दुहेरी फटका न्यायव्यवस्थेला बसत असून गंभीर गुन्ह्यांतील आरोपींना जामीन मिळणे किंवा खटले लांबणीवर पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.

- Advertisement -

आज रंगणार ‘देशदूत शिलेदार पुरस्कार’ सोहळा

उत्तर महाराष्ट्रासाठी महत्त्वाच्या असलेल्या नाशिक प्रादेशिक फॉरेन्सिक प्रयोगशाळेत जूनमध्ये ४,३०३ नवीन प्रकरणे आली होती. त्यापैकी ४,०८३ अहवाल पूर्ण करण्यात आले परंतु जुन्या अनुशेषामुळे १ जुलै रोजी नाशिक लॅबमध्ये तब्बल ६,७९५ केसेस प्रलंबित राहिल्या आहेत.

दृष्टिक्षेपात
दैनिक ताणः राज्यात दररोज सरासरी १,१०० हुन अधिक गुन्ह्यांचे नमुने (विसेरा, डीएनए, शस्खे, डिजिटल पुरावे) तपासणीसाठी येतात.
बायॉलॉजी विभागः जूनमध्ये ५,४०९ केसेस निकाली काढूनही तब्बल ६ हजार प्रकरणे अजूनही प्रलंबित.
धुळे व चंद्रपूरची चमकदार कामगिरीः धुळे लॅबने ३३१ केसेस निकाली काढत पेंडन्सी १०४ वर आणली, तर चंद्रपूरने ९१७ केसेस पूर्ण करून अनुशेष ३५८ वर आणला.
रत्नागिरी लॅबः रत्नागिरीत आलेल्या सर्व ८५ केसेस निकाली निघाल्याने पेंडन्सी ३६ वर स्थिर राहिली.

प्रयोगशाळा मे अखेर प्रलंबित जूनमध्ये निकाल १ जुलै रोजी प्रलंबित
मुंबई १४,५७०, ५,०१८, १४,३५७
पुणे ९.९४३, ४,०२४ १०,३६२
नागपूर ६,५३५, ४,६४९, ७,१६०
नाशिक ६,५७५, ४,०८३, ६,७९५
संभाजीनगर ४,०१८, ३,१०७, ४,४६२
अमरावती ४,१५९, ३,७३९, ४,५२६
कोल्हापूर ३.६३३, २,११०, ३,६७१
नांदेड २,४४७, २,९५२, २,५६१
एकूण केसेस ५३,७४१, ३१,६५२, ५५,८७२,

ताज्या बातम्या

इमारत

भिवंडीमध्ये ४ मजली इमारत कोसळली; ९ जणांचा मृत्यू; आणखी काही जण...

0
भिवंडी | Bhiwandiठाणे जिल्ह्यातील भिवंडी (Bhiwandi) शहरातील नारपोली गंगाराम वाडी (Narpoli Gangaramvadi) परिसरात शुक्रवारी पहाटे भीषण दुर्घटना घडली. चार मजली निवासी इमारत (Building Collapsed)...