शिवडे | वार्ताहर | Shivde
सिन्नर तालुक्यातील (Sinnar Taluka) शिवडे शिवारात (Shivde Shivar) घोरवड रस्त्यालगत समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) नंबर ५८३ पुलाजवळ वनविभागाच्या हद्दीत रात्रीच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या (Leopard) जागीच ठार झाल्याची घटना घडली. आज सकाळी बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे रेस्क्यू ऑपरेशन टीम यांच्या नजरेस मृत बिबट्या दिसला असता त्यांनी तात्काळ वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या बोलावून बिबट्याला त्यांच्या ताब्यात दिले.तसेच महामार्गावरील पोलीस यांनी काही काळ रस्ता थोपवून वनविभागाला बिबट्या गाडीत हलवण्यास सहकार्य केले.
हे देखील वाचा : Nashik Crime News : किर्तनकारास मारहाण करून लुटले
शिवडे परिसरात वनविभागाचे (Forest) क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असून या ठिकाणी वन्यप्राण्यांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ सुरू असते. त्यामानाने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना (Employees) याठिकाणी डोळ्यात तेल घालून रात्रंदिवस काम करावे लागते. तर रस्ते विकास महामंडळाचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असून वन्य प्राण्यांसाठी नेमून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन होताना दिसत नाही. या ठिकाणी महामार्गाच्या दोन्ही बाजूला संरक्षक भिंत बांधकामांचे काम अपूर्ण असून गेल्या दीड वर्षापासून महामार्ग आहे.
हे देखील वाचा : Nashik Crime News : सायबर चोरट्यांनी शेअर ट्रेडिंग आणि वर्क फ्रॉमचे आमिष दाखवून ३७ लाख उकळले
मात्र, रस्ते विकास महामंडळ अभियंता यांना अजून कंपनीकडून काम करून घेण्याचे उमगले नाही. त्यामुळे लवकरात लवकर एमएसआरडीसीने संबंधित ठेकेदार कंपनीकडून निदान वनविभागाच्या हद्दीतील संरक्षक कठडे बांधकाम करणे तसेच वन्य प्राण्यांसाठी (Wild Animals) ठेवण्यात आलेले अंडरपास मोकळे करणे गरजेचे आहे, असे प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष कैलास दातीर यांनी सांगितले. तसेच यासाठी रस्ते विकास महामंडळाला लवकरात लवकर निवेदनही प्रहारतर्फे देण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा