Saturday, May 23, 2026
Homeक्राईमNashik TCS Case: साठ दिवसांची डेडलाईन संपणार; पहिले चार्जशीट दाखल होण्याच्या तयारीत

Nashik TCS Case: साठ दिवसांची डेडलाईन संपणार; पहिले चार्जशीट दाखल होण्याच्या तयारीत

नाशिक | प्रतिनिधी
कॉर्पोरेट विश्वाला हादरवणाऱ्या टीसीएस कंपनीतील महिला शोषण आणि जबरदस्तीने धर्मांतरण प्रकरणाचा तपास शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. नवीन भारतीय न्याय संहिता कायद्यानुसार मिळालेल्या ६० दिवसांच्या मुदतीचा शुक्रवारी (दि. २२) शेवटचा दिवस असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांच्या विशेष तपास पथकाने आरोपींना न्यायालयात खिंडीत गाठण्यासाठी आपले दोषारोपपत्र तयार केले असून, ते सादर होण्याची शक्यता आहे.

पीडितेने २५ मार्च रोजी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून आजपर्यंतच्या तपासात पोलिसांसमोर कायद्याचे आणि वेळेचे मोठे आव्हान होते. नवीन कायद्यानुसार गंभीर गुन्ह्यांमध्ये ६० दिवसांच्या आत न्यायालयात दोषारोपपत्र सादर करणे बंधनकारक आहे. तांत्रिक किंवा कायदेशीर त्रुटीचा फायदा घेऊन संशयितांना जामीन मिळू नये, यासाठी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी स्वतः या प्रकरणावर बारीक लक्ष ठेवले आहे. सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या नेतृत्वाखालील एसआयटीने संशयितांचे डिजिटल फूटप्रिंटस्, चॅट्स आणि कॉल रेकॉर्डसूची साखळी तयार केली आहे. विशेष सरकारी वकील अजय मिसर हे स्वतः साक्षीदारांचे जबाब आणि कागदपत्रांची छाननी करत आहेत. हे प्रकरण कंपनीच्या आडून चालणारे एक मोठे नेटवर्क (सिंडिकेट) असल्याचे तपासात समोर आले आहे. नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करण्यात आला.

- Advertisement -

संपादकीय : २२ मे २०२६ – शिक्षण क्षेत्रातील बाजार बंद करा!

दरम्यान, एकाच टोळीविरुद्ध मुंबईनाका आणि देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात बलात्कार, विनयभंग, लैंगिक छळ आणि धार्मिक भावना दुखावल्याचे एकूण ९ गुन्हे दाखल आहेत.

सर्वच मुख्य संशयित कारागृहात
या संघटित गुन्ह्यातील मुख्य सूत्रधारांसह टोळीतील सर्व ९ संशयित सध्या न्यायालयीन कोठडीत (नाशिक मध्यवर्ती कारागृह) आहेत. त्यात दानिश शेख, तौसिफ अत्तार, रजा मेमन, निदा खान, शाहरुख कुरेशी, शफी शेख, आसिफ अन्सारी, अश्विनी चैनानी यांचा समावेश आहे.

ताज्या बातम्या

बिबट्याच्या हल्ल्यात तेरा वर्षीय मुलगी जखमी

0
पेठ | प्रतिनिधी Peth तालुक्यातील मोहाचापाडा येथे शेतातील जनावरांच्या गोठ्यातील वासरावर बिबट्याने हल्ला करत ठार केले व घराच्या ओट्यावर झोपलेल्या व पाहुणी म्हणून मामाकडे आलेल्या...