Friday, July 5, 2024
Homeराजकीयनाशिक शिक्षक मतदारसंघात दुसऱ्या फेरीत 'या' उमेदवाराने घेतली आघाडी

नाशिक शिक्षक मतदारसंघात दुसऱ्या फेरीत ‘या’ उमेदवाराने घेतली आघाडी

नाशिक | Nashik   

- Advertisement -

विधानपरिषदेच्या (VidhanParishad) मुंबई व कोकण पदवीधर आणि मुंबई व नाशिक शिक्षक या चार मतदारसंघासाठी सकाळी आठ वाजेपासून विविध मतदान केंद्रांवर मतमोजणी सुरु आहे. यातील मुंबई पदवीधरमधून ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल परब विजयी झाले आहेत. तर कोकण पदवीधरमधून भाजपचे निरंजन डावखरे विजय झाले आहेत. तसेच मुंबई शिक्षकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे जग्गनाथ अभ्यंकर आघाडीवर आहेत. तर नाशिक शिक्षक मतदारसंघातून (Nashik Teacher Constituency) पहिल्या फेरीत महायुतीमधील शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार किशोर दराडे आघाडीवर आहेत. त्यानंतर आता दुसऱ्या फेरीतही त्यांनी आपल्या आघाडी कायम राखली आहे.

नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या (Nashik Teacher Constituency) निवडणुकीसाठी २१ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे किशोर दराडे, महाविकास आघाडीचे संदीप गुळवे आणि अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्यात प्रामुख्याने लढत होत आहे. यामध्ये दराडे यांनी पहिल्या फेरीतील आघाडी दुसऱ्या फेरीत कायम ठेवत दुसऱ्या फेरीत 9628 मतांनी पुढे आहेत.

सर्व मतांच्या मोजणीनंतर किशोर दराडे 26316, विवेक कोल्हे 16688, संदीप गुळवे 16340 अशी मते मिळाली आहेत. किशोर दराडे या क्षणाला 9628 मतांनी पुढे आहेत. बाद मतांची गणना झाल्यानंतर कोटा ठरणार आहे. त्यानंतर पुन्हा दुसऱ्या क्रमांकाची मते मोजणी करून अंतिम निकाल दिला जाईल. कोटा जाहीर झाल्यानंतर मतांची आकडेवारी जाहीर केली जाईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या