Thursday, January 8, 2026
Homeब्रेकिंग न्यूजनाशिक शिक्षक मतदार संघ निवडणूक : शेवटच्या दिवशी 27 उमेदवारांनी 31 नामनिर्देशन...

नाशिक शिक्षक मतदार संघ निवडणूक : शेवटच्या दिवशी 27 उमेदवारांनी 31 नामनिर्देशन अर्ज केले दाखल

नाशिक | प्रतिनिधी Nashik

महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवार दि 7 जून ,2024 रोजी 27 उमेदवारांनी 31 नामनिर्देशन पत्र सादर केले असून आत्तापर्यंत 40 उमेदवारांनी 53 नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत.

- Advertisement -

आज नामनिर्देशन अर्ज दाखल करणाऱ्यामध्ये दराडे रुपेश लक्ष्मण, नाशिक यांनी अपक्ष मधून नामनिर्देशन अर्ज सादर केला आहे. गांगुर्डे बाबासाहेब संभाजी, अहमदनगर यांनी महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक सेल संघटनेतून नामनिर्देशन अर्ज सादर केला आहे. गुळवे संदिप नामदेव, अहमदनगर, अनिल शांताराम तेजा, नाशिक, कोल्हे सागर रविंद्र, नाशिक, अमोल बाळासाहेब दराडे, अहमदनगर, रखमाजी निवृत्ती भड, नाशिक, कोल्हे संदिप वसंत, नाशिक, भास्कर तानाजी भामरे, नाशिक यांनी अपक्ष म्हणून अर्ज सादर केला आहे.

YouTube video player

धनराज देविदास विसपुते, रायगड यांनी भारतीय जनता पार्टी व अपक्षतून अर्ज सादर केला आहे. भागवत धोंडीबा गायकवाड, अहमदनगर यांनी समता पार्टीतून नामनिर्देश अर्ज सादर केला आहे. गुळवे संदिप भिमाशंकर, धुळे यांनी अपक्षतून अर्ज सादर केला आहे. पंडीत सुनिल पांडुरंग, अहमदनगर यांनी अपक्ष व भारतीय जनता पार्टीतून अर्ज सादर केला आहे. गुळवे संदीप गोपाळराव यांनी शिवसेना पक्ष (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व अपक्ष मधून अर्ज सादर केला आहे. जायभाये कुंडलिक दगडू, अहमदनगर , अविनाश महादू माळी, नंदूरबार यांनी अपक्षातून अर्ज सादर केला आहे. कचरे भाऊसाहेब नारायण, अहमदनगर यांनी इंडियन नॅशनल काँग्रेस मधून अर्ज सादर केला आहे.

इरफान मो इसहाक, नाशिक यांनी अपक्षतून अर्ज सादर केला आहे. दिलीप बापुराव पाटील, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून अर्ज सादर केला आहे. बोठे रणजित नानासाहेब, अहमदनगर, सारांश महेंद्र भावसार,धुळे, गुरुळे संदिप वामनराव,अहमदनगर यांनी अपक्ष म्हणून अर्ज सादर केला आहे. दराडे किशोर भिकाजी, नाशिक यांनी शिवसेना पक्षातून अर्ज सादर केला आहे. झगडे सचिन रमेश,अहमदनगर, महेश भिका शिरुडे, नाशिक, शेख मुख्तार अहमद यांनी अपक्ष म्हणून अर्ज सादर केला आहे. दराडे किशोर प्रभाकर, नाशिक यांनी अपक्ष व राष्ट्रीय जनक्रांती पार्टीतून अर्ज सादर केला आहे.

ताज्या बातम्या