नाशिक | Nashik
आज सकाळपासून विधानपरिषदेच्या (Vidhan Parishad) नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची (Nashik Teachers Constituency) मतमोजणी शहरातील अंबड येथील वेअर हाऊसमध्ये सुरु आहे.३० टेबलवर ही मतमोजणीची (Vote Counting) प्रक्रिया पार पडत असून प्रत्येक टेबलवर सहा असे १८० कर्मचारी मतमोजणी करत आहे. या पार्श्वभूमीवर सध्या पहिल्या फेरीतील मतपत्रिकांची मोजणी सुरु करण्यात आली आहे.
हे देखील वाचा : नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीवेळी गोंधळ; शिवसेनेने घेतला आक्षेप
पहिल्या फेरीत ३० हजार मतपत्रिकांची मोजणी सुरू असून त्यातील वैद्य मते प्रत्येक उमेदवाराच्या बॉक्समध्ये टाकून वेगवेगळी केली जात आहेत. तसेच अवैध मतांची देखील मतमोजणी करण्यात येत आहे. तर दुसऱ्या फेरीत ३४ हजार ८५३ मतपत्रिकांची मोजणी केली जाणार आहे.यानंतर अवैध मतांची मोजणी करून कोटा ठरवला जाणार असून त्यानंतरच खऱ्या अर्थाने उमेदवारांची (Candidate) मतांची मोजणी केली जाणार आहे. त्यामुळे या प्रक्रियेला अजून बराच वेळ लागणार आहे.
हे देखील वाचा : नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणी प्रक्रियेत पुन्हा गोंधळ
दुसरीकडे एकमेकांची मते बाद ठरविण्यासाठी उमेदवारांमध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे. मराठी अक्षरात 1 आकडा काढला असेल तर त्याला इंग्रजी 9 समजून घेऊन त्यावर उमेदवारांकडून आक्षेप घेतला जात आहे. तसेच उमेदवारांचा एकमेकांच्या मतपत्रिकेतील हस्ताक्षरातील चूका शोधून मत बाद ठरविण्याकडे कल दिसत असून आक्षेप घेतलेली मते डाऊटफुल बॉक्समध्ये टाकली जात आहेत. याशिवाय ज्या मतांवर आक्षेप आहे त्यासंदर्भातील निर्णय निवडणूक निर्णय अधिकारी घेणार आहेत.
हे देखील वाचा : नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणी प्रक्रियेच्या गोंधळाची उद्धव ठाकरेंनी घेतली दखल
दरम्यान,पहिल्या फेरीच्या ३० हजार मतपत्रिकांच्या मोजणीत महायुतीचे किशोर दराडे महाविकास आघाडीचे संदीप गुळवे व अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्या नावापुढे ठेवण्यात आलेल्या मतांची संख्या मोठी असल्याने या तिघांमध्ये ‘काटे की टक्कर’ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच सध्या महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार एकमेकांचा लीड तोडताना दिसत आहेत. तर दुसऱ्या क्रमांकाची मते मोजून रात्री उशिरापर्यंत निकाल लागण्याची शक्यता आहे.
शिक्षित गुरुजींचा अशिक्षित पणा
पहिल्या फेरीच्या मोजणीमध्ये हवाई धमतांमध्ये एक चिठ्ठी आढळून बाद होणाऱ्या मतांच्या पत्रिकेंवर बहुतांश ठिकाणी स्वतःच्या पेनाने निशाणी करणे, एकच क्रमांक दोन जणांना देणे बरोबरची निशाणी करणे अथवा स्वाक्षरी करणे असले प्रकार शिक्षक मतदारांनी केली आहे. वेळोवेळी सूचना देऊनही निवडणूक निर्णय अधिकारी दिलेल्या पेनानेच क्रमांक देण्याची सूचना असतानाही चुका करण्यामुळे मदत पत्रिका बाद ठरल्या आहेत.
ज्यादा मत पत्रिकेचा प्रश्न
येवला निफाड व चोपडा येथे मतपेटीत सापडलेल्या ज्यादा मतपत्रिका स्वतंत्र ठेवण्यात आले असून मतांच्या फरकामध्ये मोठी तफावत असल्यास त्याचा फारसा परिणाम जाणवणार नाही.मात्र अटीतटीची असल्यास त्याचा विचार केला जाईल असे बोलले जात आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा