Saturday, July 6, 2024
Homeनगरकोल्हेंपाठोपाठ ना. विखेंच्या बंधूंची अपक्ष उमेदवारी दाखल

कोल्हेंपाठोपाठ ना. विखेंच्या बंधूंची अपक्ष उमेदवारी दाखल

नाशिक शिक्षक मतदारसंघात चुरस वाढली || आणखी 11 इच्छुकांनी अर्ज नेले, 7 जूनला अंतिम मुदत

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

नाशिक शिक्षक मतदरसंघाच्या निवडणुकीसाठी नगर जिल्ह्यातून जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सोमवार (दि.3) रोजी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू राजेंद्र विखे पाटील यांनी दोन स्वतंत्र अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामुळे शिक्षक मतदारसंघासाठी आता नगर जिल्ह्यातून आतापर्यंत तीन उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत.

अर्ज दाखल करण्यासाठी अजून तीन दिवसांचा कालावधी असून या काळात कोण कोण अर्ज दाखल करणार याकडे जिल्ह्यासह विभागाचे लक्ष राहणार आहे. दरम्यान, धुळ्यातील उमेदवार निशांत रंधे यांनी काल भाजपच्या नावे एक आणि दोन अपक्ष असे स्वतंत्र अर्ज दाखल केल्याने या निवडणुकीसाठी भाजप कोणाला एबी फॉर्म देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार

आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी 31 मे रोजी पहिल्या दिवशी 39 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज नेले होते. त्यानंतर काल सोमवारी आणखी 11 इच्छुकांनी अर्ज नेले असून मतदारसंघातील पाच जिल्ह्यातून उमेदवारी अर्ज नेलेल्या इच्छुकांची संख्या आता 50 झाली आहे. दरम्यान पहिल्या दिवशी 3 आणि काल आणखी सहा असे 9 उमेदवारी अर्ज दाखल झालेले असून यात कोल्हे यांचे दोन अपक्ष अर्जाचा यांचा समावेश असून त्यानंतर काल विखे यांनी दोन अपक्ष अर्ज दाखल केलेले आहेत. यासह निशांत रंधे (ता. शिरपूर, धुळे) यांचे 3 आणि एक अर्ज भाजपच्या नावावर असे तीन अर्ज भरलेला आहे. तर राजेंद्र निकम (मालेगाव, नाशिक) यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल झालेला आहे. यामुळे या मतदारसंघात आतापर्यंत 9 उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत.

अर्ज दाखल करण्यास 7 जून शेवटची मुदत असून पहिल्या दोन दिवसात नगर जिल्ह्यातून तिघांचे पाच अर्ज दाखल झाल्याने या निवडणुकीसाठी यंदा मोठ्या संख्याने उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता व्यक्त होते आहे. निवडणुकीसाठी विभागातील नाशिक, नगर, धुळे, नंदूरबार, जळगाव हे पाच जिल्हे कार्यक्षेत्र आहे. 7 जूनपर्यंत उमेदवारी दाखल केल्यानंतर 10 तारखेला छानणी आणि त्यानंतर 12 जूनला दाखल अर्ज काढता येणार आहेत. त्यानंतर प्रत्यक्षात 26 तारखेला मतदान होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या