Saturday, July 27, 2024
HomeनाशिकNashik News : नेवासातील 'त्या' घटनेविरोधात नाशिकमध्ये निषेध

Nashik News : नेवासातील ‘त्या’ घटनेविरोधात नाशिकमध्ये निषेध

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

बिनशेती जमिनीतून असलेला वहीवाट रस्ता संबंधित जमीन मालकाने बंद केल्यामुळे सदर परिसरातील नागरिकांनी त्या विरोधात राजमुद्रा चौक नेवासा फाटा येथे रस्ता रोको आंदोलन केले होते. या आंदोलकांच्या समस्या समजून घेण्यासाठी घटनास्थळावर गेलेल्या नेवासा तहसीलदार यांना मारहाण करण्यात आली. या घटनेचा नाशिक तहसीलदार, नायब तहसीलदार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत निषेध नोंदवण्यात आला…

- Advertisement -

जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना बाबासाहेब पारधे, राजेंद्र वाघ यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रस्तारोको करणाऱ्या नागरिकांच्या समस्या समजून घेण्यासाठी व कायदा सुव्यवस्थेच्या
दृष्टीकोनातून नेवासा तहसीलदार डॉ. संजय बिरादार यांनी तेथे भेट दिल होती.

तेथे शासकीय कामकाज करत असताना उक्त गटाचे मालक करणसिंह घुले, सत्यजित घुले व ज्ञानेश्वर घुले यांनी सर्व नागरिकांसमक्ष बिरादार यांना मारहाण करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

One Nation One Election विशेष अधिवेशन काळात दिल्ली सोडू नका; केंद्र सरकारचे सर्व अधिकारी, सचिवांना आदेश

बिरादार करीत असलेल्या शासकीय कामकाजात घुले यांनी अडथळा आणला आहे. तसेच मागील वर्षभरात अहमदनगर जिल्ह्यात अवैध गौणखनीज कारवाई करीत असताना कर्जतचे उपविभागीय अधिकारी डॉ. अजीत थोरबोले, परीविक्षाधिन तहसीलदार राहुल गुरव आणि जिल्हा खनिकर्म अधिकारी यांच्यावर जिवघेणा हल्ला करण्यात आला होता.

त्यामुळे या सर्व घटनांचा तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना निषेध करत
आहे. शासकीय कामकाज करीत असताना शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यावर नियमबाह्य काम करण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातो व त्या अनुषंगाने शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना दमदाटी करणे, धमकी देणे, शिवीगाळ व मारहाण करुन कामकाजात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत करण्याच्या घटना
वारंवार घडत आहेत.

त्याचा शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मनोधैर्यावर परिणाम होत आहे. असेच होत राहिले तर राज्यामध्ये कायद्याची अंमलबजावणी व शासकीय योजनांची अंमलबजावणी करणे अवघड होणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीत किस्सा खुर्चीचा! शरद पवार अन् ममता बॅनर्जींमध्ये नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

- Advertisment -

ताज्या बातम्या