Monday, January 26, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Trimbakeshwar News : पत्रकारांना मारहाण केल्याप्रकरणी तिघांना अटक; इतरांचा शोध सुरु

Nashik Trimbakeshwar News : पत्रकारांना मारहाण केल्याप्रकरणी तिघांना अटक; इतरांचा शोध सुरु

नाशिक | Nashik

आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथे शनिवार (दि.२०) रोजी साधू-महंतांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी जाणाऱ्या पत्रकारांना त्र्यंबकेश्वर येथील स्वामी समर्थ कमानीजवळ प्रवाशी गाड्यांच्या पावत्या फाडणाऱ्या चार ते पाच जणांच्या टोळक्याने जबर मारहाण केली. यात किरण ताजणे (पुढारी न्यूज), येमेश खरे (झी २४ तास), अभिजित सोनवणे (साम टीव्ही) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना अपोलो रुग्णालयात (Apolo Hospital) दाखल करण्यात आले.

- Advertisement -

शहरातील प्रसिध्दी माध्यमांसह सर्व स्तरातून या घटनेचा निषेध होत असून, दोषींवर कठोर कारवाई (Action) करण्याची मागणी केली जात होती. त्यानंतर आता या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिसांनी (Trimbakeshwar Police) तिघांना (Arrested) अटक केली असून, इतरांचा शोध सुरु आहे. प्रशांत राजू सोनवणे, शिवराज धनराज आहेर, ऋषिकेश योगेश गांगुर्डे अशी अटक केलेल्यांची नावे असून, त्यांच्या इतर तीन साथीदारांचा शोध घेतला जात आहे.

YouTube video player

दरम्यान, त्र्यंबक नगरपरिषदेकडून (Trimbakeshwar NMC) शहरात येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांकडून वाहन फी वसुली केली जात असून, हे वसुलीचे काम एएस मल्टी सर्व्हिसेस, खारघर नवी मुंबई या कंपनीला दिले आहे. १ कोटी ८ लाख रुपयांचा हा वार्षिक ठेका असून, अनिल शुक्ला असे ठेकेदाराचे नाव आहे. त्यांच्याकडे नगरपरिषदेचा सफाई, पाणीपुरवठा आणि पार्किंग वसुलीचा ठेका असून, त्यांनी दोन अधिका-यांकडे हा चालवायला दिला आहे. या अधिकाऱ्यांनी वसुलीसाठी काही मुले नेमली असून, ही मुले वाहन प्रवेश फीची वसुली करताना प्रचंड उर्मट वागत असल्याच्या अनेक तक्रारी आलेल्या आहेत. याच मुलांनी पत्रकारांना मारहाण केली आहे.

नेमकं काय घडलं?

इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार हे शनिवारी साधू महंत यांच्या बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी जात असता त्यांनी आम्ही बैठकीच्या वातांकनासाठी चाललो आहोत असे सांगितले. त्यावेळी पावती फाडणाऱ्यांकडून गाड्या बाजूला घेण्यास सांगत तुम्ही पत्रकार किंवा कोणीही असला तरी आम्ही तुमच्या गाड्या सोडणार नाहीं असे फर्मान सोङने, त्यावरून प्रचंड गोंधळ झाल्यानंतर या वसुलीधारकांनी आपल्या इतर साथीदारांना बोलावून घेतले. यावेळी जमा झालेल्या टोळक्याने पत्रकारांना लाथाबुक्क्या, छवी आणि दगडांनी मारहाण केली. त्यामुळे त्र्यंबकमध्ये वाहन फी वसुली केली जाते की दंड असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे वृत्त समजताच त्यांनी तातडीने या प्रकरणाचा छडा लावण्यासोबतच पत्रकारांच्या उपचाराबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडीओ कॉलद्वारे किरण ताजणे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. उपचाराचा खर्च शिवसेनेतर्फे केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.तसेच पत्रकारांवरील हल्ला हा अतिशय निंदनीय आहे. पत्रकार हे लोकशाहीचे चौथे स्तंभ असून, त्यांच्यासोबत झालेले असे प्रकार अजिबात सहन केले जाणार नाहीत. या घटनेचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो आणि दोषर्षीवर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही देतो. असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले

भुजबळ, महाजन यांनी घेतली जखमींची भेट

अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी अपोलो रुग्णालयात जाऊन जखमी पत्रकारांची विचारपूस केली. तर सिंहस्थ मंत्री गिरीश महाजन यांनी देखील रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील या घटनेचा निषेध नोंदवत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली.

ताज्या बातम्या

Shrirampur : पतीचा गळा आवळून खून; दत्तनगरची खळबळजनक घटना

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur श्रीरामपूर येथील दत्तनगरमध्ये पत्नीने पतीच्या डोक्यात लाकुड मारत गळा आवळून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सदर महिलेचा पती हा दारु पिवुन...