Thursday, March 27, 2025
Homeनाशिकआता मागे नाही राहायचं! नाशिकची महिला विराजमान होणार 'कोण होणार करोडपती'च्या हॉट...

आता मागे नाही राहायचं! नाशिकची महिला विराजमान होणार ‘कोण होणार करोडपती’च्या हॉट सीटवर

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सोनी मराठी वाहिनीने प्रेक्षकांना पुन्हा एकदा करोडपती होण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. ‘आता मागे नाही राहायचं’, असं सांगत ’कोण होणार करोडपती’ (kon honaar crorepati) हा लोकप्रिय कार्यक्रम स्पर्धकांसाठी एक नाही तर तब्बल २ करोड रुपये जिंकण्याची संधी घेऊन आला आहे. म्हणजेच ‘कोण होणार करोडपती’ कार्यक्रमात आता बक्षिसाची रक्कम दुप्पट झाली आहे…

- Advertisement -

प्रश्नोत्तरांच्या या मनोरंजक खेळात सुप्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर (Sachin Khedekar) यांचे दमदार निवेदन आणि दिलखुलास संवादकौशल्य प्रेक्षकांना पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे. नाशिकच्या वर्षा पगार २२ आणि २३ जून रोजी हॉट सीटवर बसणार आहेत.

निरनिराळ्या क्षेत्रांतले स्पर्धक ‘कोण होणार मंचावर पाहायला मिळतात. या पर्वात सहभागी होण्यासाठी तब्बल १४ लाख स्पर्धकांनी नोंदणी केली होती. पुढील नोंदणी प्रक्रियेला सामोरे जात त्यांतून काही स्पर्धक निवडले गेले. आपली स्वप्नपूर्ती व्हावी या आशेने हे प्रेक्षक या खेळाचा भाग होतात. मुळात नाशिकच्या असलेल्या आणि कोलकत्ता येथे स्थायिक असलेल्या वर्षा पगार (Varsha Pagar) या हॉट सीटवर येणार आहे. रिजनल प्रोविडेंट फंड कंमिशनर म्हणून त्या कार्यरत आहेत.

उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषदेत मोठी घोषणा; म्हणाले, “येत्या १ जुलै रोजी…!”

सचिन खेडेकर यांच्यासोबत रंगलेल्या तिच्या गप्पा नक्कीच प्रेक्षकांना आवडतील. त्यांनी चक्क सचिन खेडेकरांकडून कविता म्हणून घेतल्या त्या प्रेक्षकांना नक्कीच आवडतील. आता कोण होणार करोडपती च्या हॉट सीटवर आल्यावर वर्षा कशा प्रकारे खेळतील आणि करोडपती व्हायचे तिचे स्वप्न पूर्ण करतील का हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

आता हॉट सीटवर आल्यावर वर्षा कशी आणि किती रक्कम जिंकून जातात हे पाहणे नाशिकरांसाठी उत्सुकतेचे ठरणार आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी सोनी मराठी वाहिनीवर रात्री ९ वाजता हा कार्यक्रम प्रदर्शित होणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Nashik Crime News : अंगावरील दागिने लुटून वृद्ध महिलेची निर्घृण हत्या; गुन्हा दाखल

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : २७ मार्च २०२५ – उभारी देणारा उपक्रम

0
कोणत्याही सरकारी व्यवस्थांवर-सेवांवर सामान्यतः टीकाच केली जाते. विशेषतः सार्वजनिक आरोग्यसेवेचा उल्लेख केला तरी असंख्य तक्रारींचा पाऊस पडल्याचे अनेकदा आढळते. तथापि ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाचा एक...