Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Water Storage : गोदावरीत ११,०७९ क्युसेकने विसर्ग; दारणा, गंगापूरच्या पाणलोटात मध्यम...

Nashik Water Storage : गोदावरीत ११,०७९ क्युसेकने विसर्ग; दारणा, गंगापूरच्या पाणलोटात मध्यम पाऊस

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

दारणा, गंगापूर धरणांच्या (Darna and Gangapur Dam) पाणलोटात काल दिवसभर अधूनमधून मध्यम स्वरुपाच्या पावसाचे (Rain) आगमन होत होते. नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यातून जायकवाडीच्या (Jaykwadi) दिशेने गोदावरीत (Godavari) काल सकाळपर्यंत एकूण जवळपास २.५ टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. काल सायंकाळी ही गोदावरीत ११०७९ क्युसेकने विसर्ग सुरु होता. दरम्यान, त्र्यंबकेश्वरमध्ये तब्बल १०५ मिमी तर इगतपुरीत १०० मिमी पावसाची नोंद झाली आहे.

- Advertisement -

दारणा धरणाचा साठा ६१.३५ टक्क्यांवर स्थिर आहे. तर गंगापूरचा ६५.८८ टक्क्यांवर स्थिर आहे. भावली धरण ५५.३७ टक्के भरले आहे. पालखेड ५३.७५ टक्क्यांवर पोहचले आहे. मुकणे ४५.१० टक्के, वाकी ४६.०३ टक्के, भाम ३३.०८ टक्के, वालदेवी ५८.३४ टक्के, कश्यपी ४२.८७ टक्के, गौतमी गोदावरी २४.२५ टक्के, कडवा ४३.८४ टक्के, आळंदी २१.०८ टक्के, भोजापूर ५५.६८ टक्के असा साठा झाला आहे.

YouTube video player

सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर तीन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने (Rain) दारणा, भावलीच्या पाणलोटातील घाटमाथ्यावरील धबधबे कोसळू लागले आहेत. त्यामुळे धरणात पाण्याची आवक सुरुच आहे. काल सकाळी मागील २४ तासांत दारणात ३५६ दलघफू नवीन पाण्याची आवक झाली. दारणा ६१.३५ टक्के भरले असून यातून ४७४२ क्युसेकने विसर्ग सुरु आहे. काल सकाळपर्यंत या धरणातून अर्धा टीएमसीहून अधिक पाण्याचा विसर्ग दारणा नदीत केला जात आहे.

दारणातील पाणी गोदावरीवरील नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यात (Nandur Madhmeshwar Dam) सामावत आहे. गंगापूर धरणात १२२ दलघफू नवीन पाण्याची आवक २४ तासात झाली. काल अखेरपर्यंत या धरणात एकूण १.३ टीएमसी नवीन पाणी दाखल झाले. अन्य धरणातही कमी अधिक प्रमाणात नवीन पाणी दाखल होत आहे. गंगापूरमधून काल सायंकाळी ३९४४ क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. कडवातून ७९५ क्युसेकने विसर्ग सुरु आहे.

तसेच नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यात दारणा, गंगापूर, व कडवातून विसर्ग दाखल होत आहे. तसेच नांदुरमधमेश्वर बंधाऱ्याच्या पाणलोटातील पावसाचे (Monsoon) पाणी दाखल होत असल्याने या बंधाऱ्यातून गोदावरीत जायकवाडीच्या दिशेने काल सायंकाळी ११०७९ क्युसेकने विसर्ग करण्यात येत होता. काल सकाळपर्यंत जायकवाडीच्या दिशेने या बंधाऱ्यातून गोदावरीत २.५ टीएमसी पाण्याचा (Water) विसर्ग करण्यात आला.

गोदावरीची पाणीपातळी नियंत्रणात

गंगापूर धरणातून विसर्ग होत असला तरी गोदावरी नदीची पाणी पातळी सध्या नियंत्रणात आहे. दोन दिवसांपूर्वी गोदाघाटावरील दुतोंड्या मारुतीच्या मूर्तीच्या कमरेपर्यंत पाणी पोहोचले होते. सध्या ते पायथ्याशी आले असून, धोका टळला आहे.

दारणा धरणातून दुपारी बारा वाजता विसर्ग

आज (रविवारी ) दुपारी १२ वाजता दारणा धरणातून नदी पूर पाणी विसर्ग ६६३ क्युसेसने कमी करून एकूण ४०७९ क्युसेस करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील धरणांचा विसर्ग

दारणा ४,७४२ क्युसेक
गंगापूर ३९४४ क्युसेक
कडवा ७९५ क्युसेक
पालखेड २,८०० क्युसेक
होळकर ब्रीज ३५९० क्युसेक
नांदूरमध्यमेश्वर ११०७९ क्युसेक
पुनद ३२४ क्युसेक

ताज्या बातम्या

Rahata : शिर्डीतील तरुणाला जिवंत जाळले, कुख्यात पोकळेसह टोळी जेरबंद

0
राहाता |प्रतिनिधी| Rahata अहिल्यानगर जिल्ह्याला हादरवून सोडणारी एक अत्यंत भीषण आणि निर्घृण खुनाची घटना उघडकीस आली आहे. राहाता परिसरातून बेपत्ता झालेल्या सचिन गिधे या तरुणाचा...