Friday, July 12, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिक होणार 'क्वालिटी सिटी'

नाशिक होणार ‘क्वालिटी सिटी’

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

कौशल्य विकास (Skill development), स्वच्छता आणि शिक्षण (Sanitation and Education) या क्षेत्रांवर पहिल्या टप्प्यात भर असलेल्या ‘क्वालिटी सिटी नाशिक ‘ (‘Quality City Nashik’) या चळवळीची घोषणा मनपा येथे झालेल्या बैठकीत करण्यात आली.

स्कील इंडीया (Skill India) अर्थात कौशल भारत कुशल भारत मोहिमेअंतर्गत क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया आणि नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (Quality Council of India and National Skill Development Corporation) यांच्या मार्गदर्शनाखाली ही चळवळ राबविण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियासमवेत नाशिक महानगरपालिका (Nashik Municipal Corporation), नाशिक जिल्हा परिषद (Nashik Zilha Parishad), क्रेडाई नाशिक मेट्रो (Credai Nashik Metro), नाशिक सिटीझन्स फोरम (Nashik Citizens Forum), श्री रामकृष्ण आरोग्य संस्थान यांच्यात सामंजस्य करार करण्यात येणार आहे.

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (Municipal Commissioner and Administrator Dr. Chandrakant Pulkundwar), जिल्हा परिषदेच्या मुुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल (Zilha Parishad Chief Executive Officer Ashima Mittal), क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष जक्षय शहा, एनएसडीसीचे सीईओ आणि एनएसडीसी इंटरनॅशनलचे व्यवस्थापकीय संचालक वेद मणी तिवारी व नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे संचालक जितुभाई ठक्कर, नासिक सिटीजन फोरमचे विक्रम सारडा यांच्या प्रमुख उपस्थितीत महानगरपालिकेच्या सभागृहात झालेल्या बैठकीत या करारावर चर्चा करण्यात आली.

देशातील शहरांच्या शाश्वत विकासाला गती देण्यासाठी तेथील मनुष्यबळाचा दर्जा आणि गुणवत्ता वाढविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारी ही चळवळ नाशिकमध्ये प्रायोगिक तत्त्वावर राबविली जाणार आहे. ही चळवळ पथदर्शी स्वरुपात राहणार असून पुढे अन्य शहरांमध्येही तीचे अनुकरण केले जाऊ शकेल. या उपक्रमासाठी देशात ५ शहरांची निवड करण्यात आली असून त्या शहरातील पहिला सन्मान हा नाशिकला मिळाला आहे. याचा लाभ नाशिकच्या समग्र विकासासाठी निश्चित होईल, असा विश्वास खा. हेमंत गोडसे (MP Hemat Godse) यांनी व्यक्त केला.

या सामंजस्य कराराअंतर्गत एक सुकाणू समिती स्थापन केली जाईल. ज्यामध्ये प्रत्येक संस्थेचे दोन सदस्य असतील. समिती सामंजस्य कराराची व्याप्ती आणि उद्दिष्टे साध्य करण्यासाठी कार्यपद्धती विकसित करण्यावर अधिक विचार करेल. क्वालिटी सिटी नाशिकच्या (Quality City Nashik) सुकाणू समितीने शहरातील उद्योग, व्यापार, बांधकाम क्षेत्र, शिक्षण, सामाजिक अशा विविध क्षेत्रांतील संघटनांना या चळवळीत सहभागी करून घेतले आहे.

नाशिक जिल्ह्यामध्ये कौशल्य विकास, स्वच्छता आणि शिक्षण हे चळवळीचे तीन प्रमुख उदिष्ट असून यासाठी नाशिक महापालिका, क्रेडाई नाशिक मेट्रो, सिटीझन्स फोरम, आयमा, निमा, असो ऑफ कन्सल्टिंग सिविल इंजी., इन्स्टिट्यूट ऑफ इंडिअन इंटेरीयर डिझाईनर्स, आर्किटेकट अँन्ड इंजिनिअर्स, इंडिअन मेडिकल असो., बिल्डर्स असो ऑफ इंडिया, नरेडको , कॉम्प्युटर असोसिएशन, नाईस, नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर, निता, लायन्स क्लब, रोटरी क्लब, आयसी एआय, फिक्की, महाराष्ट्र चेम्बर्स, तान, निपम, नाशिक स्कूल असोसिएशन, आयसीएआय,

कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया, केमिस्ट असोसिएशन, रिक्षा चालक संघटना, इंस्टीट्यूशन ऑफ इंजिनियर्स, इंडिअन प्लंबिंग असो , नाशिक फर्स्ट , मी नाशिककर , इंडियन अॅकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स, असोचेम , कॉर्पोरेटर्स, को-ऑप बँक फेडरेशन, सामुदायिक संस्था, शासकीय, निमशासकीय विभाग – जिल्हा परिषद, एनएमसी, आदिवासी विकास, महसूल विभाग या सर्वांचे सहकार्य लाभणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या