Friday, January 23, 2026
HomeUncategorizedNashik Yeola News : येवला नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी भाजपच्या गायकवाड यांची बिनविरोध निवड

Nashik Yeola News : येवला नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी भाजपच्या गायकवाड यांची बिनविरोध निवड

येवला | Yeola

येवला नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी आज (सोमवारी) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भाजप महायुतीच्या वतीने भाजपच्या पुष्पा गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच स्वीकृत नगरसेवकपदी अमजद शेख व समीर समदडीया यांची निवड करण्यात आली. यावेळी येवला येथे माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला.

- Advertisement -

यावेळी ते म्हणाले की, मंत्री छगन भुजबळ यांनी येवल्याच्या केलेल्या विकासावर येवलेकरांनी शिक्कामोर्तब करत राष्ट्रवादी व भाजप महायुतीला बहुमत दिले. त्यानुसार आता नगराध्यक्षपदी राजेंद्र लोणारी व उपनगराध्यक्षपदी पुष्पा गायकवाड यांना संधी मिळाली आहे. यांच्यासोबत सर्व युतीचे उमेदवार येवल्याच्या विकासासाठी एकमताने प्रयत्न करतील. येवलेकरांना विकासाची जी वचने आपण दिली आहे. ती सर्व पूर्ण करून येवल्याचा परिपूर्ण असा विकास साधला जाईल असे समीर भुजबळ यांनी सांगितले.

YouTube video player

दरम्यान, यावेळी विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, गटनेते दिपक लोणारी, भाजपचे नेते प्रकाश दायमा,माजी नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, कैलास सोनवणे, विधानसभा उपाध्यक्ष दत्ता निकम, प्रवक्ते राजेश भांडगे, सचिन शिंदे,भाजप शहराध्यक्ष मिननाथ पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ताज्या बातम्या

‘देशदूत गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो’ आजपासून

0
नाशिक | प्रतिनिधी Nashikदैनिक 'देशदूत' आयोजित गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो २०२६फला आजपासून (दि.२३) मोठ्या उत्साहात प्रारंभ होत आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध सिनेअभिनेते मिलिंद गुणाजी...