नाशिक | प्रतिनिधी Nasik
नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांची पदोन्नती झाली असून त्यांची जालन्याच्या जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सुपर फिफ्टी उपक्रम
मित्तल यांच्या संकल्पनेतून ‘सुपर फिफ्टी’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे, ज्याचा उद्देश आदिवासी मुलींना शिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे, टाटा इलेक्ट्रॉनिक्स कंपनीने आदिवासी मुलींसाठी कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. नाशिक जिल्हा परिषदेने १०० दिवसांच्या कार्यक्रमात चांगली कामगिरी केली, ज्यामध्ये कार्यालयाच्या कामकाजात सुधारणा करण्यात आली. त्यांनी जिल्हा परिषदेच्या निधीच्या गैरव्यवहारांवर कारवाई करत, चुकीचे नियोजन रोखले आहे
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी नाशिक जिल्हा परिषदेत अनेक नवनवीन उपक्रम राबवले, जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे कामही त्यांच्याच कारकिर्दीत पूर्णत्वास आहे. दरम्यान आशिमा मित्तल यांच्या बदली नंतर नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण असणार या बाबत वृत्त नाही.






