Wednesday, January 7, 2026
HomeनाशिकNashik ZP Election : इगतपुरी तालुक्यातील कुठल्या गण-गटात पुरुषांना संधी? कोणाचा हिरमोड

Nashik ZP Election : इगतपुरी तालुक्यातील कुठल्या गण-गटात पुरुषांना संधी? कोणाचा हिरमोड

घोटी | वार्ताहर | Ghoti

इगतपुरी पंचायत समितीच्या (Igatpuri Panchayat Samiti) १० गणांची आरक्षण सोडत इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे (Trimbakeshwar) उपविभागीय अधिकारी जीव्हीएस पवन दत्ता तहसीलदार अभिजित बारवकर, निवासी नायब तहसीलदार धनंजय लचके यांच्या अध्यक्षतेखाली इगतपुरी पंचायत समितीच्या कार्यालयात काढण्यात आली. या सोडतीमध्ये ५ गण विविध प्रवर्गाच्या महिलांसाठी आरक्षित करण्यात आले.

- Advertisement -

पंचायत समितीच्या गणांपैकी अनुसूचित जमातीसाठी ४, अनुसूचित जातीसाठी १, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी २ आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी ३ गण आरक्षित करण्यात आले. इगतपुरी पंचायत समिती येथील सभागृहात झालेल्या आरक्षण सोडतीसाठी तालुक्यातील (Taluka) सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

YouTube video player

अनुसूचित जाती प्रवर्गाच्या महिलेसाठी घोटी बुद्रुक हा गण राखीव झाल्याने या गणातून निवडून येणारी महिला इगतपुरी पंचायत सभापती होणार आहे. ओबीसीसाठी कावनई, ओबीसी स्त्री साठी नांदगावसदो, अनुसूचित जाती स्त्री साठी घोटी बुद्रुक, सर्वसाधारणसाठी वाडीवऱ्हे, साकुर, सर्वसाधारण स्त्री साठी मुंढेगाव, अनुसूचित जमाती स्त्री साठी धामणगाव ( जुना टाकेद बुद्रुक गण), खंबाळे, अनुसूचित जमातीसाठी बेलगाव तऱ्हाळे ( जुना खेड गण ), काळूस्ते हे गण आरक्षित करण्यात आले आहेत. तर घोटी गण हा आता अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने अनुसूचित जमातीच्या नेत्यांचा हिरमोड झाला आहे.

दरम्यान, आतापर्यंतच्या इतिहासात सभापतीपद हे राखीव असायचे मात्र आता नव्यानेचे अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने घोटी गणाला संधी मिळणार आहे. घोटी येथील स्थानिक रहिवासी व घोटी ग्रामपालिकेचे माजी उपसरपंच रूपाली रूपवते यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. घोटी ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्यांनी मोठ्या प्रमाणात विकासकामे केली असून मंत्री संजय शिरसाठ यांचे भाचे प्रशांत रुपवते यांच्या पत्नी रूपाली रूपवते यांच्याकडे नजरा लागून आहेत.

गटांचे आरक्षण

खंबाळे – (अनुसूचित जमाती)

वाडीवऱ्हे गट – (अनुसूचित जमाती)

घोटी बु गट – (सर्वसाधारण )

नांदगाव सदो गट – (अनुसूचित जमाती महिला)

टाकेद गट (धामणगाव गट ) – (अनुसूचित जमाती )

ताज्या बातम्या

AMC Election : पैसे वाटपाचा संशय, विनानंबर दुचाकीतून लाखाची रोकड पकडली

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना पैसे वाटप केले जात असल्याच्या संशयावरून एका पक्षाच्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी दोन दुचाकी अडवून त्या तोफखाना पोलिसांच्या ताब्यात दिल्या....