सटाणा | प्रतिनिधी | Satana
बागलाण पंचायत समिती (Baglan Panchayat Committee) सभागृहात आगामी पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील एकूण १४ पंचायत समिती गणातील आरक्षण (Gan Reservation) जाहीर करण्यात आले. यापूर्वी सभापती पदासाठी नागरिकांचा मागास प्रवर्गाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर गणांमध्ये एकूण ७ जागा महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. यानंतर आता आरक्षणाच्या निकषावर आधारित इतर ठिकाणी देखील प्रबळ दावेदार असलेल्या इच्छुकांची तारेवरची कसरत होणार आहे.
बागलाणचे प्रांताधिकारी महेश शेलार, तहसीलदार कैलास चावडे, नायब तहसीलदार सचिन मारके आदींसह प्रशासकीय कर्मचारी व तालुक्यातील (Taluka) पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत लहान बालकाच्या हस्ते आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली.
दरम्यान, बागलाण पंचायत समितीमध्ये एकूण जागांपैकी अनुसूचित जाती १ ( महिला ),अनुसूचित जमाती एकूण ६ ( ३ महिला ) नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण ३ ( २ महिला), सर्वसाधारण ४ (१ महिला ) अशा पद्धतीने आरक्षण निघाले आहे.
गणांचे आरक्षण
मानूर – अनुसूचित जमाती, डांगसौंदाणे – अनुसूचित जमाती, अंतापुर – अनुसूचित जमाती महिला, ताहाराबाद- अनुसूचित जमाती महिला, जायखेडा- सर्वसाधारण, कोटबेल- सर्वसाधारण, अंबासन- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, नामपुर – अनुसूचित जाती महिला, विरगाव – अनुसूचित जमाती, चौंधाणे – अनुसूचित जमाती महिला, ठेंगोडा – नागरिकांचा मागास प्रवर्ग, मुंजवाड- सर्वसाधारण महिला, ब्राह्मणगाव – सर्वसाधारण, लखमापूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग अशा पद्धतीने आरक्षण जाहीर झाले आहे.
गटांचे आरक्षण
मानूर – अनुसूचित जमाती महिला,ताराहाबाद – अनुसूचित जमाती महिला, जायखेडा – नागरिकांचा मागास प्रवर्ग, नामपुर – सर्वसाधारण महिला, विरगाव – अनुसूचित जमाती, ठेंगोडा – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि ब्राह्मणगाव – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला




