Tuesday, January 6, 2026
HomeनाशिकNashik ZP News : माजी विद्यार्थ्यांचा दिवाळीत कृतज्ञतेचा दिवा! माझी शाळा, माझा...

Nashik ZP News : माजी विद्यार्थ्यांचा दिवाळीत कृतज्ञतेचा दिवा! माझी शाळा, माझा अभिमान अंतर्गत तीन कोटी ४१ लाखांची मदत

शिक्षण मंत्र्यांचा तालुका आघाडीवर

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्ह्यात (District) राबविण्यात आलेल्या ‘माझी शाळा माझा अभिमान’ (Mazhi Shala Mazha Abhimaan) या अभिनव उपक्रमात शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी (Student) सहभागी होत आपल्या शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि लोकवर्गणीतून ३ कोटी ४१ लाख ०२ हजार २५८ रुपयांची मदत शाळांना दिली आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) शिक्षण विभागाने २३ ते २६ ऑक्टोबर या चार दिवसांत राबवलेल्या या अभिनव उपक्रमाला जिल्हाभरात प्रचंड प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील ३,२४० जिल्हा परिषद शाळांमध्ये ५८ हजार ९९५ माजी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. हा उपक्रम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या संकल्पनेतून साकारला गेला.

YouTube video player

दिवाळीच्या (Diwali) पार्श्वभूमीवर गावाकडे परतलेल्या माजी विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेशी पुन्हा जोडण्याचा, शाळेच्या आठवणींना उजाळा देण्याचा आणि शाळेबद्दल अभिमानाची भावना दृढ करण्याचा हेतू या मोहिमेमागे होता. चार दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातील शाळांमध्ये माजी विद्यार्थ्यांचे स्नेहमेळावे, शाळा स्वच्छता व रंगरंगोटी, वृक्षारोपण, ग्रंथदान असे उपक्रम घेण्यात आले. अनेक शाळांनी या योगदानातून आपला परिसर सुशोभित केला असून गावकऱ्यांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. या उपक्रमादरम्यान माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

दरम्यान, या उपक्रमाद्वारे जिल्हाभरात केवळ शाळांचा (School) विकासच नव्हे, तर ग्रमीण भागातील शिक्षणाविषयीची आत्मीयता पुन्हा जागृत झाली आहे. प्रत्येक माजी विद्यार्थ्याने आपल्या शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि माझी जिल्हा परिषद शाळा’ हा शब्द अभिमानाने उच्चारला, ‘माझी शाळा माझा अभिमान हे अभियान म्हणजे विद्यार्थी आणि शाळा या भावनिक बंधांची पुनर्निर्मिती करणारा यशस्वी प्रयोग ठरला असून राज्यातील इतर जिल्ह्यांसाठी हा उपक्रम आदर्श ठरणार आहे.

शिक्षण मंत्र्यांचा तालुका आघाडीवर

या उपक्रमात शिक्षणमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या मालेगाव तालुक्यात लोकवर्गणीतून ११लाख ३९ हजार ३२८ रुपये रोख जमा झाले आहेत, तर ७४ लाख ७७ हजार ६२० च्या वस्तू स्वरूपात जमा झाले आहेत. असा एकूण ८६ लाख १६ हजार ९४८ रुपये लोकवर्गणी जमा झाली आहे. त्र्यंबकेश्वर तालुका मात्र पिछाडीवर असून अवघे एक लाख १५ हजार ९०४ रुपये लोकवर्गणीतून जमा झाले आहेत.

रोख वस्तू देणगीचे तपशील

रोख रक्कम : ६५ लाख ७६ हजार ८२३ रुपये
वस्तू देणगी : २ कोटी ७४ लाख २५ हजार ४३५ रुपये
एकूण योगदान : ३ कोटी ४१ लाख ०२ हजार २५८ रुपये. तसेच शिक्षणोपयोगी साहित्य, क्रीडा साहित्य, टीव्ही, ध्वनीक्षेपक संच, आरओ फिल्टर, सौर ऊर्जा संच, सोलर लाइट्स यांसारख्या वस्तू माजी विद्यार्थ्यांकडून शाळेस भेट म्हणून देण्यात आल्या

आपल्याला घडविणाऱ्या शाळेला काहीतरी परत द्यायची भावना प्रत्येकाच्या मनात असते. ‘माझी शाळा-माझा अभिमान’ या उपक्रमाद्वारे ती भावना कृतीत उतरविण्यासाठी हा प्रयत्न करण्यात आला. गावाचा आत्मा म्हणजे शाळा आणि शिक्षण हा विकासाचा पाया आहे हा संदेश या अभियानातून जिल्ह्याने दिला आहे.

ओमकार पवार,मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. नाशिक

ताज्या बातम्या

संपादकीय : ६ जानेवारी २०२६ – नवा वाचनतोडगा

0
वाचनसंस्कृती रुजवण्याची गरज नुकत्याच सातारा येथे पार पडलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाली. उपमुख्यमंत्र्यांनी या संदर्भात केलेल्या घोषणेमुळे तिची आठवण पुन्हा...