Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik ZP Reservation : इच्छुकांच्या मनसुब्यांवर पाणी; 'या' नेत्यांची संधी हुकली, तर...

Nashik ZP Reservation : इच्छुकांच्या मनसुब्यांवर पाणी; ‘या’ नेत्यांची संधी हुकली, तर ‘यांचा’ उमेदवारीचा मार्ग मोकळा

महिलांसाठी ३७ गट राखीव

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

साडेतीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर नाशिक जिल्हा परिषद गटांची आरक्षण (Nashik ZP Reservation) सोडत सोमवारी (दि. १३) जाहीर करण्यात आली. जिल्ह्यातील १५ तालुक्यांतील (Taluka) एकूण ७४ गटांपैकी ३७ जागा महिलांसाठी राखीव करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक महिलांना राजकारणात नेतृत्वाची संधी मिळणार असली, तरी काही इच्छुक पुरुष उमेदवारांच्या आशा धुळीस मिळाल्या आहेत.

- Advertisement -

गट आरक्षण सोडतीमुळे जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काही गट आरक्षित ठरल्याने काही बड्या नेत्यांच्या वारसांना किंवा निश्चित केलेल्या उमेदवारांना (Candidate) आता नव्याने रणनीती आखावी लागणार आहे. काही इच्छुकांच्या गटात आरक्षण आल्याने त्यांच्या घरात ‘लॉटरी’ लागल्यासारखा आनंद साजरा होत आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीचे ‘फटाके’ फुटण्यास सुरुवात झाली आहे.

YouTube video player

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (Aayush Prasad) व उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि.१३) दुपारी १२ वाजता येथील महाकवी कालिदास कलामंदिरात जिल्हा परिषद गट आरक्षण सोडत काढण्यात आली. सुरुवातीला ७४ गटांचे विभाजन माडण्यात आले. यात ‘एसटी’साठी २९ गट, ‘एससी’साठी पाच गट, ‘ओबीसी’साठी १९ आणि सर्वसाधारण प्रवर्गाला २१ गट हे लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने निश्चित करण्यात आले.

सुरुवातीला ‘एससी साठी राखीव ५ गटांची नावे जाहीर करण्यात आली. त्यानंतर ‘एसटी’, ‘ओबीसी’ आणि ‘सर्वसाधारण’ याप्रमाणे गटांचे आरक्षण ठरल्यानंतर प्रत्येक प्रवर्गातील महिलांसाठी राखीव ५० टक्के जागांची निवड ‘ईश्वरी चिट्ठी ‘ पध्दतीने करण्यात आली. पारदर्शक बरणीत सर्व चिठ्या टाकून त्यांची सरमिसळ करून एकेक चिठ्ठी बाहेर काढण्यात आली. ‘ओबीसी’चे १९ गट निश्चित करण्यासाठी ४० गटांच्या चिठ्ठ्या बरणीत टाकण्यात आल्या.

त्यानंतर हर्षदा कुरेया विद्यार्थिनीने १९. चिठ्ठया कातूर अधिकाऱ्यांकडे सुपुर्द केल्या. याप्रमाणे महिलांचेही आरक्षण निघाले. अर्पिता बोराडे या मुलीने ‘एसटी महिला आरक्षण चिठ्ठ्या काढल्या. आरक्षण सोडत पाहण्यासाठी महाकवी कालिदास कलामंदिरात इच्छुकांची तोबा गर्दी झाली होती. आपला गट आरक्षित झाल्याचे समजताच हिरमोड झालेल्या इच्छुकांनी सभागृहातून काढता पाय घेतला.

आरक्षणाचा (Reservation) अंदाज बांधलेला असला तरी महिला किंवा पुरुष यापैकी कुणाला संधी मिळते, याकडे लक्ष असलेले इच्छुक ही प्रक्रिया संपेपर्यंत बसून होते. यात जिल्हा परिषदेचे माजी सदस्य उदय जाधव, दीपक शिरसाठ, गोरख चोडके, कुणाल दराडे, विष्णूपंत म्हैसधुणे, गोकुळ गिते, विनायक माळेकर, भारत कोकाटे, तेज कवडे, अनिल ढिकले, अंकुश देवरे, उत्तम कातकाडे आदींचा समावेश होता.

जिल्हाधिकाऱ्यांची तत्परता

जिल्हा परिषद गट आरक्षण सोडतीस जिल्हाधिकारी आयुष प्रसाद स्वतः हजर होते. प्रक्रिया सुरु झाल्यानंतर गटाच्या नावाची चिड्डी कॅमेरासमोर दाखवताना कॅमेरामन ‘स्क्रीन ‘समोर येत होता. त्यामुळे मागे बसलेल्या लोकांना ‘स्क्रीन’ दिसत नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आले त्यांनी जागेवरून उठून कॅमेरामनला एका कोफ्यातील जागा निश्चित करून दिली. त्यानंतर प्रक्रिया पार पडली.

कही खुशी, कही गम

फिरत्या आरक्षण पद्धतीला छेद देऊन नव्याने झालेल्या आरक्षण सोडतीत काही ठिकाणच्या इच्छुकांचा हिरमोड झाला. काही इच्छुकांना अनपेक्षित ‘लॉटरी’ लागली. गट आरक्षित झाल्याचे लक्षात येताच निराश झालेल्या इच्छुकांनी महाकवी कालिदास कलामंदिर सोडले. याउलट आपल्या सोयीचे आरक्षण निघाल्याबद्दल काही इच्छुकांनी तेथेच आनंदोत्सव साजरा केला.

यांचा उमेदवारीचा मार्ग मोकळा

माजी अध्यक्ष शीतल सांगळे, जयश्री पवार, अंजुम कांदे, मनीषा पवार, केदा आहेर, किरण थोरे, धनश्री आहेर, सीमंतिनी कोकाटे, भारत कोकाटे, गोकुळ झिरवाळ, धनराज महाले, विनायक माळेकर, संजय पवार, राजेंद्र पवार, संजय बनकर, संभाजी पवार, मकरंद सोनवणे, गीतांजली पवार, उदय जाधव, इंद्रजित गावित, एन.डी. गावित.

यांची संधी हुकली

माजी अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, पंढरीनाथ थोरे, विजयश्री चुंभळे, कुणाल दराडे, उदय सांगळे, संपतराव सकाळे, दत्तात्रय पाटील, डॉ. आत्माराम कुंभार्डे, डी. के जगताप, डॉ. सयाजी गायकवाड, प्रवीण जाधव, यतीन पगार, सिद्धार्थ वनारसे.

गटनिहाय आरक्षण

ओबीसी : कसबे सुकेणे, नांदूरशिंगोटे, पळसे, सोमठाणे, दाभाडी, वडाळीभोई, पाटोदा, जायखेडा, मालेगाव

ओबीसी महिला : कळवाडी, साकोरी निंबायती, उगाव, ब्राह्मणगाव, चांदोरी, ठेंगोडे, खाकुर्डी, सायखेडा, दापूर, तळेगाव रोही

एससी : दुगाव व रावळगाव

एससी महिला : एकलहरे, राजापूर, लासलगाव

एसटी : आंबे, कोचरगांव, अहिवंतवाडी, हरसूल, हतगड, अंजनेरी, गिरणारे, धामणगांव, उमराळे बु, कसबेवणी, वीरगाव, खंबाळे, मोहाडी, वाडीव-हे

एसटी महिला : उंबरठाण, अभोणा, पुनदनगर, ताहाराबाद, विल्होळी, नांदगाव सदो, मानूर, वडनेरभैरव, खेडगाव, कोहोर, ठाणापाडा, कनाशी, मानूर, ठाणगाव

सर्वसाधारण : सौंदाणे, निमगाव, लोहणेर, खडे वाजगाव, न्यायडोंगरी, भालूर, नगरसूल, मुखेड, पालखेड, नांदूरमध्यमेश्वर, घोटी बु, ठाणगाव

सर्वसाधारण महिला : नामपूर, झोडगे, उमराणे, धोडांबे, साकोरे, जातेगाव, अंदरसूल, विंचूर, मुसळगाव.

ताज्या बातम्या

Nashik Accident News : चाचडगाव टोलनाक्याजवळ ईरटीका-स्कॉर्पिओचा भीषण अपघात; चौघे जागीच...

0
दिंडोरी | Dindori तालुक्यातील नाशिक-पेठ रस्त्यावरील (Nashik-Peth Road) चाचडगाव टोलनाक्याजवळ (Chachadgaon Toll Plaza) ईरटीका आणि स्कॉर्पिओचा भीषण अपघात (Ertika-Scorpio Accident) झाल्याची घटना घडली आहे. या...